Journalist Sushil Thorat Attack Case : पारनेर : साम टीव्हीचे पत्रकार सुशील थोरात आणि त्यांचा मुलगा सार्थक यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी (Journalist Sushil Thorat Attack Case) हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी (Demand for strict action) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पारनेर पोलीस स्टेशनला (Parner Police Station) लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.
जिल्ह्यात गुंडगिरी आणि अवैध धंद्यांमध्ये वाढ
अहिल्यानगर जिल्ह्यात गुंडगिरी आणि अवैध धंद्यांमध्ये वाढ होत असून, पत्रकारांनाही लक्ष्य केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. गुरुवारी (दि. २० ऑगस्ट २०२६) सायंकाळी पाईपलाईन रोडवरील एचडीएफसी बँकेसमोर सुशील थोरात आणि त्यांचा मुलगा सार्थक यांच्यावर काही जणांनी हल्ला केला. थोरात यांनी संबंधितांच्या अवैध व्यवसायाबाबत बातम्या केल्याने त्यांच्यावर हल्ला करण्याची संधी शोधली जात होती, असा आरोप पत्रकार संघाने केला. किरकोळ वादाचे निमित्त करून हा हल्ला करण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या घटनेत दोघेही सुदैवाने बचावले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पत्रकारांवरील हल्ले खपवून घेणार नाहीत (Journalist Sushil Thorat Attack Case)
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे म्हणाले, “पत्रकाराला जात-धर्म नसतो. तो प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असतो. आज एका पत्रकारावर हल्ला झाला आहे, उद्या दुसऱ्या पत्रकारावर होऊ शकतो. पत्रकारांवरील हल्ले यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. गरज पडल्यास पत्रकारांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरू.”
हल्लेखोरांचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी, पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गंभीर कलमे लावावीत तसेच त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची चौकशी करून मकोका अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. संबंधितांवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचा दावा पत्रकार संघाने केला.
निवेदन स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी हे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल, तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई करून पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी आवश्यक ती दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी दत्ता गाडगे, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड, पीएसआय रणजीत मारक, पारनेर तालुकाध्यक्ष संतोष तांबे, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे, शहराध्यक्ष भगवानराव गायकवाड यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.



