Jyoti Gade | अहिल्यानगरी कॉलनी आमराई कॉलनी म्हणून ओळखली जाईल : महापौर ज्योती गाडे

0

Jyoti Gade | नगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी मनपा प्रभाग क्रमांक एकमध्ये विकासाच्या योजनांबरोबर एक कुटुंब एक झाड उपक्रम राबवत नागरिकांमध्ये संवर्धनाची आवड निर्माण केली आहे. त्याचबरोबर मनुष्य झाडावरती प्रेम करत पर्यावरण संतुलनासाठी पुढे आले आहेत. आंब्याच्या झाडाचे वाटप करून प्रभागातील कॉलनींना आमराईचे रूप प्राप्त होईल, असे प्रतिपादन महापौर ज्योती गाडे ( Jyoti Gade ) यांनी केले.

नक्की वाचा : नीट परीक्षा केंद्राने न घेता राज्याने घ्यावी : पालकमंत्री राधाकृष्ण विखे

एक कुटुंब एक झाड उपक्रमांतर्गत ( Jyoti Gade )

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या संकल्पनेतून अहिल्यानगरी कॉलनी येथे एक कुटुंब एक झाड उपक्रमांतर्गत महापौर ज्योती गाडे यांच्या हस्ते आंब्याच्या झाडाचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, सागर पुंड, मच्छिंद्र खोकराळे, गजानन देशमुख, शशिकांत राहीज, किरण वाळुंजकर, सागर राऊत, विनीत भागवत, नलिनी जोशी, विजया खोकराळे आदींसह कॉलनीतील नागरिक उपस्थित होते. ज्योती गाडे पुढे म्हणाल्या की, अहिल्यानगर दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे वृक्षांचे जंगल कमी होत चालले असून, काँक्रीटचे व औद्योगिकीकरणाचे जंगल वाढले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी झाली असल्यामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम झालेले दिसत आहेत. ऋतुमानातदेखील दिवसेंदिवस बदल होत चालले असून, कोणत्याही ऋतुमानात ऊन, वारा, पाऊस पाहायला मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

विविध विकासाची कामे मार्गी ( Jyoti Gade )

संपत बारस्कर म्हणाले की, मनपा प्रभाग क्रमांक एक हा नागरिकांच्या सहकार्यातून स्वच्छ, सुंदर, हरित करण्याचा मानस असून, गेल्या दहा वर्षांपासून प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लावून संवर्धनाचे काम केले आहे. कॉलनीतील अंतर्गत रस्त्यावर नागरिक वृक्ष लावण्यास टाळाटाळ करत असत. मात्र, आंब्याचे झाड दिल्यावरती नागरिक त्याचे संवर्धन करण्याचे काम करत असे म्हणून प्रभागातील नागरिकांना एक कुटुंब एक झाड उपक्रम सुरू केला. त्यामध्ये दहा ते पंधरा फूट उंचीचे आंब्याचे झाड मोफत घरपोच केले जाते. त्यांच्यामध्ये वृक्षाचे महत्त्व पटवून देण्याचे काम केले जाते. लोकसहभाग असल्याशिवाय वृक्षारोपणाची व संवर्धनाची लोकचळवळ उभी राहू शकत नाही. आंब्याचे झाडे आपल्याला फळ, ऑक्सिजन देत असून, हिंदू संस्कृतीमध्ये आंब्याच्या झाडाच्या पानाच्या तोरणाला शुभ मानले जाते. आमदार संग्राम जगताप व महापालिकेच्या माध्यमातून प्रभागामध्ये विविध विकासाची कामे मार्गी लावली आहेत. या माध्यमातून स्वच्छ, सुंदर, हरित प्रभाग निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रभागातील नागरिकांनी संपत बारस्कर यांच्या उपक्रमाचे कौतुक करत विकासकामांचे स्वागत केले. आम्ही कधीही विकासकामाबाबत सूचना केल्या नाहीत, मात्र नगरसेवक संपत बारस्कर व नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे यांनी अहिल्यानगरी कॉलनीतील सर्वच विकासाची कामे मार्गी लावली आहेत. तसेच आम्हाला मोफत आंब्याचे वृक्ष भेट देत पर्यावरणाचा संदेश दिला, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here