
Theft of generator armature : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील मांजरसुंबा (Manjarsumba) गावातील उंबर वस्ती परिसरात घरासमोर लावून ठेवलेल्या दोन जनरेटर आर्मिचरची चोरी (Theft of generator armature) झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) अज्ञात व्यक्तीविरोधात दोन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, उंबर वस्ती येथील दोन घरासमोरील दोन जनरेटर आर्मिचर ठेवण्यात आले होते. अज्ञात चोरट्यांनी संधी साधून हे दोन्ही आर्मिचर चोरून नेले. चोरीची घटना लक्षात आल्यानंतर संबंधितांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
शेतकरी , ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण (Theft of generator armature)
दरम्यान, याच परिसरात काही दिवसांपूर्वी विद्युत पंपाच्या केबल चोरीची घटनाही घडली होती. त्यामुळे परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मांजरसुंबा परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांनी नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तसेच जनरेटर आर्मिचर चोरीप्रकरणी संशयितांचा शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.


