Manoj Jarange Patil : डॉक्टरांनी दिलेल्या रिपोर्टवर मनोज जरांगेंनीच व्यक्त केली शंका; नेमकं काय घडलं?

0
Manoj Jarange Patil : डॉक्टरांनी दिलेल्या रिपोर्टवर मनोज जरांगेंनीच व्यक्त केली शंका; नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil : डॉक्टरांनी दिलेल्या रिपोर्टवर मनोज जरांगेंनीच व्यक्त केली शंका; नेमकं काय घडलं?

नगर : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत पुन्हा एकदा उपोषणाला (Hunger strike) सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. वैद्यकीय पथकाकडून त्यांची नियमितपणे तपासणी करण्यात येत आहे. मात्र डॉक्टरांनी जो रिपोर्ट दिला आहे, त्यावर खुद्द मनोज जरांगे पाटील यांनीच शंका उपस्थित केली आहे. पत्रकारांनीच या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावावा असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो सावध व्हा! सोयाबीन आणि कपाशीवर ‘या’ किडींचा प्रादुर्भाव वाढला

रविवारी (ता.२९) संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली होती. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. मात्र त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी कमी होण्यास सुरुवात झाली होती. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले? (Manoj Jarange Patil)

जरांगे पुढे म्हणाले की, पत्रकारांनी सोक्षमोक्ष लावावा. पहिल्या दिवशी माझी शुगर ९४ होती. दुसऱ्या दिवशी ते म्हणाले, शरीरातील साखरेची पातळी ६६ आहे. ९४ वरून थेट ६६ वर आली. त्यानंतर शुगर वाढली ती ७२ झाली, ७२ वरून ती ८० वर पोहोचली आहे. शुगर अचानक वाढायला कशी लागली? शुगर तर कमीच व्हायला पाहिजेना कारण मी तर काही जागा सोडत नाही. नाहीतर तुम्हाला वाटायचं मी काहीतरी खातोय. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी काही खोतोय, तर मशिन आणून इथे चेक करा.

अवश्य वाचा : नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; ७ जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी

‘पत्रकारांनी याचा सोक्षमोक्ष लावायला पाहिजे’ (Manoj Jarange Patil)

माझ्या पोटात एक जण अन्नाचा कट आणि पाण्याचा थेंब निघाला तर तुम्ही म्हणाल तिथे जीव द्यायला मी तयार आहे. अशी कोणती ही यंत्रणा आहे, हा विषय सिरियस आहे, खरंच सिरियस आहे. पत्रकारांनी याचा सोक्षमोक्ष लावायला पाहिजे, असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. माझी शुगर कमी व्हायला लागली तर ती कमीच व्हायला पाहिजे ना? ती अचानक वाढायला कशी लागली? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.