SIT | नगर : अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर येथील धीरजसिंह कचरूसिंह परदेशी खून प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सकल हिंदू समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन देताना आमदार संग्राम जगताप उपस्थित होते.
नक्की वाचा : नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; ७ जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी
‘जुन्या वादातून खून’ झाल्याचा दावा (SIT)
निवेदनात म्हटले आहे की, पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये ‘जुन्या वादातून खून’ झाल्याचा दावा करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. मात्र, संबंधित फिर्यादीमध्ये धीरज परदेशी यांचे नाव नसल्याचा तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्येही ते दिसत नसल्याचा दावा निवेदनकर्त्यांनी केला आहे.
अवश्य वाचा : नव्या चेहऱ्यांची नवी प्रेमकहाणी; ‘धप्पा’चा रोमँटिक फर्स्ट लुक पोस्टर समोर
स्वतंत्रपणे पडताळणी करावी (SIT)
घटनेच्या दिवशी धीरज परदेशी हे सावेडी येथील कामावर हजर होते आणि त्यांनी वरिष्ठांना जीपीएस लोकेशनचे फोटो पाठविल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या दाव्यांची एफआयआर, सीसीटीव्ही, जीपीएस व अन्य उपलब्ध पुराव्यांच्या आधारे स्वतंत्रपणे पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“खुनामागील नेमके कारण स्पष्ट झाले पाहिजे; तपासात कोणतीही पोकळी राहता कामा नये,” अशी भूमिका घेत सकल हिंदू समाजाने सध्याच्या तपासी अधिकाऱ्यांकडून तपास काढून स्वतंत्र SITकडे तपास वर्ग करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.



