Anna Hazare : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली; मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

Anna Hazare : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली; मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

0
Anna Hazare : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली; मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल
Anna Hazare : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली; मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

Anna Hazare : नगर : ज्येष्ठ समाजसेवक (Veteran Social Activist) अण्णा हजारे (Anna Hazare) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये (Bombay Hospital) दाखल करण्यात आले आहे. त्यांना ताप, अशक्तपणा, खोकला आणि डिहायड्रेशनचा त्रास जाणवत होता. तसेच किडनीच्या तपासणीसाठीही त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात चार लाख २६ हजार असंकलित मतदार; सुनिल गाढे यांची माहिती

तीव्र विषाणू संसर्ग वाढल्याने मुंबईत उपचार

गेल्या काही दिवसांपासून हजारे यांची प्रकृती खालावली होती. सुरुवातीला त्यांच्यावर मूळ गावी राळेगण सिद्धीजवळील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तीव्र विषाणू संसर्ग आणि डिहायड्रेशनचा त्रास वाढल्याने प्रगत वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना मुंबईत हलवण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

डॉक्टरांकडून प्रकृतीची सविस्तर तपासणी (Anna Hazare)

सध्या ते बॉम्बे हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली आहेत. डॉ. गौतम भन्साळी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीची सविस्तर तपासणी करत असून, त्या निष्कर्षांनुसार पुढील उपचारांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here