नगर : अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी बेमुदत उपोषणाला (Indefinite hunger strike) बसलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यातच,आज दुपारी दीडच्या सुमारास त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. जरांगे पाटील यांना उलटी आणि मळमळ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नक्की वाचा : रक्ताचे नाते बनले वैरी! चुलत भावाचा खून करणाऱ्या तरुणाला जन्मठेप
जरांगे पाटील यांचा आरोग्य तपासणीस नकार (Manoj Jarange Patil)
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. त्यांना मळमळ आणि उलटीचा त्रास झाल्याने आरोग्य पथकातील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करण्याचा दोन-तीन वेळा प्रयत्न केला. मात्र, जरांगे पाटील यांनी वैद्यकीय तपासणी करून घेण्यास नकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे डॉक्टरांना त्यांच्या प्रकृतीबाबत आवश्यक वैद्यकीय निरीक्षण नोंदवता आले नाही.
अवश्य वाचा : ‘जयंती २’ मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट; ट्रेलर प्रदर्शित
आरोग्य पथकासमोर अडचण (Manoj Jarange Patil)
उपोषणामुळे शरीरावर होणारे परिणाम लक्षात घेता डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी तपासणीस नकार दिल्याने आरोग्य पथकासमोरही अडचण निर्माण झाली आहे.



