Fadnavis’s favorite leader : नगर : गेल्या काही काळापासून संग्राम जगताप, नितेश राणे महेश लांडगे हे तिन्ही नेते आक्रमक हिंदुत्ववादी नेते म्हणून पुढे आले आहेत. त्यातील राणे आणि लांडगे भाजपमध्ये आहेत, तर जगताप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात आहेत. यापैकी कोणता नेता आवडतो, असा प्रश्न एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यांनी यावर भन्नाट उत्तर दिले आहे.
जिल्हा परिषद शाळेंमध्ये कला व क्रीडा शिक्षकांची भरती करा : खासदार निलेश लंके
काय म्हणाले फडणवीस?
एका वृत्त वाहिनीने मुख्यमंत्र्यांची ही मुलाखत घेतली आहे. त्यामध्ये मुलाखतकाराने हा प्रश्न विचारला. तो विचारताना त्यांना राज्याचे मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि आमदार महेश लांडगे या नावांचे पर्याय ठेवण्यात आले होते. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, तिन्ही नेते हिंदू नायक आहेत. हिंदुत्वाकरता काम करत आहेत आणि त्यांनी हिंदुत्वासाठीच काम केलं पाहिजे. पण हिंदुत्वासाठी काम करताना माझी एकच अपेक्षा आहे की, हिंदुत्वाचा मूळ गाभा ही सहिष्णुता आहे. ती सहिष्णुता आपण समजून घेतली पाहिजे. सर्वसमावेशकता असली पाहिजे.
कुकडी साखर कारखान्यावर जिल्हा बँकेची जप्तीची कारवाई; ३७० कोटींच्या थकबाकीपोटी मालमत्ता ताब्यात
फडणवीसांना कोण खटकतं? (Fadnavis’s favorite leader)
मी नेहमी सांगतो सर्व समावेशकतेचा अर्थ असा नाही की, कोणी आपल्या थोबाडात मारलं तर दुसरा गाल पुढे करायचे. थोबाडात मारणाऱ्याला थोबाडातच मारली पाहिजे. मात्र आपण स्वत:हून कोणाच्या थोबाडात मारु नका. हिंदू सहिष्णूच आहे आणि सहिष्णूच राहिला पाहिजे. सहिष्णुता हाच हिंदुत्वाचा दागिना आहे, असे उत्तर फडणवीस यांनी देत कोणत्याही एका नेत्याचे नाव घेणे टाळले. त्यानंतर त्यांना दुसरा प्रश्न विचारण्यात आला. सर्वात जास्त खटकणारे विरोधी व्यक्तिमत्व कोण? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावरही फडणवीस यांनी भन्नाट उत्तर दिले. त्यांच्यासमोर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे असे पर्याय समोर ठेवण्यात आले होते. एका वाक्यात उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, हे तिन्ही नेते खटकणारे नाहीत.



