ADCC Bank Voter List : जिल्हा सहकारी बँकेच्या प्रारुप मतदार यादीवर २३८ हरकती; संगमनेरमधून सर्वाधिक हरकती

0
ADCC Bank Voter List : जिल्हा सहकारी बँकेच्या प्रारुप मतदार यादीवर २३८ हरकती; संगमनेरमधून सर्वाधिक हरकती
ADCC Bank Voter List : जिल्हा सहकारी बँकेच्या प्रारुप मतदार यादीवर २३८ हरकती; संगमनेरमधून सर्वाधिक हरकती

ADCC Bank Voter List : नगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती दाखल करण्याची मुदत संपली आहे. या प्रक्रियेत प्रशासनाकडे एकूण २३८ हरकती व सूचना प्राप्त झाल्या असून, यामध्ये तब्बल १२३ हरकती एकट्या संगमनेर तालुक्यातून आल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगली आहे.

कुकडी साखर कारखान्यावर जिल्हा बँकेची जप्तीची कारवाई; ३७० कोटींच्या थकबाकीपोटी मालमत्ता ताब्यात

तालुकानिहाय हरकती

इतर तालुक्यांचा विचार केल्यास नेवासा व अकोले येथून प्रत्येकी १४, श्रीगोंदा व नगर तालुक्यातून प्रत्येकी १२, पारनेर व कर्जत येथून प्रत्येकी १०, तर राहाता व कोपरगाव तालुक्यातून प्रत्येकी ९ हरकती दाखल झाल्या आहेत. याशिवाय जामखेडमधून ७, पाथर्डीमधून ६, श्रीरामपूरमधून ५, शेवगावमधून ४ आणि राहुरी तालुक्यातून ३ हरकती प्रशासनाला मिळाल्या आहेत.

जिल्हा परिषद शाळेंमध्ये कला व क्रीडा शिक्षकांची भरती करा : खासदार निलेश लंके

नाशिक येथे सुनावणी (ADCC Bank Voter List)

यंदाच्या निवडणुकीसाठी बँकेचे एकूण ३ हजार ६७७ मतदार पात्र आहेत. मात्र छाननीदरम्यान ३६६ संस्थांचे ठराव अपात्र ठरले असून २३३ संस्थांनी आपले ठराव वेळेत सादर केलेले नाहीत. प्राप्त झालेल्या सर्व २३८ हरकतींवर ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत नाशिक येथील सह उपनिबंधक कार्यालयात निवडणूक प्राधिकरणाकडून सुनावणी घेतली जाईल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १५ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर साधारण १५ ते २० दिवसांत बँकेच्या २१ संचालक पदांसाठीचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम अधिकृतपणे घोषित केली जाण्याची शक्यता आहे.