A Brothel in The House | अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात घरात कुंटणखाना; तीन महिलांची सुटका

0

A Brothel in The House | नगर : अहिल्यानगर एमआयडीसी परिसरातील गजानन कॉलनीमध्ये घरातच कुंटणखाना (  A Brothel in The House ) चालवून तीन महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत उघडकीस आला. या प्रकरणी रजनी प्रभाकर डहाळे (वय ५६, रा. गजानन कॉलनी, एमआयडीसी, अहिल्यानगर) या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान तीन महिलांची सुटका करण्यात आली.

नक्की वाचा : आजारी वृध्दाचे अपहरण करून मालमत्ता हडपली; वकिलासह ८ जणांवर गुन्हा दाखल

घरात महिलांमार्फत वेश्याव्यवसाय ( A Brothel in The House )

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक कल्पना पवार आणि एलसीबीचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक बुधवारी (ता.२) एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना गजानन कॉलनीतील एका घरात महिलांमार्फत वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलिसांकडून खातरजमा ( A Brothel in The House )

या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक म्हणून संबंधित ठिकाणी पाठविले. वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष घरावर छापा टाकला. छाप्यावेळी रजनी डहाळे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्या घराची झडती घेतली असता तेथे तीन महिला आढळून आल्या. 

पोलिसांनी केलेल्या चौकशीत या महिलांनी रजनी डहाळे हिने त्यांना वेश्याव्यवसायासाठी आणल्याचे सांगितले. ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यातील काही रक्कम महिलांना देत त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहितीही त्यांनी पोलिसांना दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत उपनिरीक्षक संदीप दरवडे, पोलीस अंमलदार विकास साळवे, विष्णू भागवत, शाहीद शेख, बिरप्पा करमल, अशोक लिपणे, विजय ठोंबरे, चिमा काळे यांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here