
District Collector Dr. Pankaj Ashiya : संगमनेर : संगमनेर तालुक्यातील अवैध धंदे, वाळू व मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (District Collector Dr. Pankaj Ashiya) यांनी प्रशासनाला दिले. गरज भासल्यास संबंधितांवर मोक्का, तडीपारी आणि MPDA कायद्यांतर्गत कारवाई करावी. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारांवर व्यापक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
संगमनेरच्या सर्व शासकीय विभागांची बैठक (District Collector Dr. Pankaj Ashiya)
संगमनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित सर्व शासकीय विभागांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी अरुण उंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रविण सीनारे, उपविभागीय वन अधिकारी अमरजीत पवार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, सर्व पोलिस निरीक्षक तसेच विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.


