Ganeshotsav : सार्वजनिक गणेशोत्सव पूर्णपणे ध्वनी प्रदूषण मुक्त करा; मुम्मका सुदर्शन यांचे आवाहन 

गुन्हेगारांना गणेशोत्सव काळात तडीपार करण्याची मागणी

0
Ganeshotsav : सार्वजनिक गणेशोत्सव पूर्णपणे ध्वनी प्रदूषण मुक्त करा; मुम्मका सुदर्शन यांचे आवाहन 
Ganeshotsav : सार्वजनिक गणेशोत्सव पूर्णपणे ध्वनी प्रदूषण मुक्त करा; मुम्मका सुदर्शन यांचे आवाहन 

Ganeshotsav : राहुरी : सार्वजनिक गणेशोत्सव (Ganeshotsav) पूर्णपणे ध्वनी प्रदूषण मुक्त (Noise Pollution-Free) असला पाहिजे. नशा मुक्त असला पाहिजे. यासाठी सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (Mummaka Sudarshan) यांनी केले. राहुरी नगरपालिकेच्या डॉ. दादासाहेब तनपुरे सभागृहात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची शांतता समितीची बैठक झाली. 

नक्की वाचा : कर्जत तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींवर अद्यापही प्रशासक राज

गुन्हेगारांना गणेशोत्सव काळात तडीपार करण्याची मागणी
गुन्हेगारांना गणेशोत्सव काळात तडीपार करण्याची मागणी

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश अत्यंत स्पष्ट: सुदर्शन

त्यावेळी पोलीस अधीक्षक सुदर्शन म्हणाले ,डीजे बाबतीत  सर्वोच्च न्यायालयाचे आदेश अत्यंत स्पष्ट आहेत. त्या आदेशांची कडकपणे अंमलबजावणी करणे हे प्रशासनाचे धोरण आहे .त्यामुळे कार्यकर्त्यांनी ध्वनी प्रदूषण मुक्त गणेशोत्सव राहील याची पूर्ण काळजी घ्या. याआधी काय झाले.खटले दाखल का झाले नाहीत. या पेक्षा आता नियमांचा भंग झाल्यास पोलीस प्रशासन कडक कारवाई करेलच.  पोलीस प्रशासनावर तशी वेळ आणू नये. तसेच नशा मुक्त अभियान यासाठी देखील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे .एक गाव एक गणपती ही मोहीम जास्तीत जास्त गावांमध्ये राबवली जावी.तालुक्यातील फक्त नऊ गावात ती राबविली आहे. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

विसर्जन मिरवणुकीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी (Ganeshotsav)

ती संख्या वाढली पाहिजे. प्रत्येक गणेश मंडळाला एक कर्मचारी नेमून दिला जाईल. गणेश स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंतच्या मंडळाला येणाऱ्या अडचणींबाबत त्याचे मार्गदर्शन व सहकार्य मिळेल. रस्ते आडवला जाणार नाही ते बघितले जावे विसर्जन मिरवणुकीच्या वेळी विशेष काळजी घेतली जावी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी प्रास्ताविक केले एक गाव एक गणपती असणारे गावांचे संख्या वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी उपविभागीय अधिकारी अधीक्षक जयदत्त भवर यांचे स्वागत केले .

गुन्हेगारांना गणेशोत्सव काळात तडीपार करण्याची मागणी

तर मुख्याधिकारी विद्या पाटील यांनी पोलीस अधीक्षक मुम्माका सुदर्शन यांचा सत्कार केला .चर्चेत प्रतीक तनपुरे,उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, नगरसेवक सोन्याबापू जगधने, गणेश विघे,देवेंद्र लांबे, आप्पासाहेब ढूस यांनी भाग घेतला. आप्पासाहेब ढूस यांनी देवळाली प्रवरातील व तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली. अरुण साळवे यांनी गुन्हेगारी खटले दाखल असलेल्या गुन्हेगारांना या काळात तडीपार करण्याची मागणी केली.

तहसीलदार डॉ. अमित पाटील, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, राहुरीचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे,राहुरीच्या मुख्याधिकारी विद्या पाटील, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, नगरसेवक सोन्याबापू जगधने राहुरीचे विरोधी पक्ष नेते अरुण साळवे, नगरसेवक प्रतीक तनपुरे, राजेंद्र उंडे, नंदकुमार तनपुरे,आर आर तनपुरे,अक्षय तनपुरे, प्रदीप भुजाडी, बबन गुलदगड, राजेंद्र उंडे, यावेळी व्यासपीठावर हजर होते. आझाद मित्र मंडळ, व्यंकटेश मित्र मंडळ,  मळगंगा मंडळ, गजानन मंडळ, श्रीराम दत्त मंडळ, श्री दत्त मंडळ,महालक्ष्मी मंडळ, आदी गणेश मंडळ कार्यकर्ते बैठकीत हजर होते.