Vidhi Saini : अहिल्यानगरच्या मॅक्सिमस स्पोर्ट्स ॲकॅडमीची विधी सैनी देशात अव्वल; राष्ट्रीय व राज्य बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची लयलूट

Vidhi Saini : अहिल्यानगरच्या मॅक्सिमस स्पोर्ट्स ॲकॅडमीची विधी सैनी देशात अव्वल; राष्ट्रीय व राज्य बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची लयलूट

0

Vidhi Saini : नगर : अहिल्यानगरच्या मॅक्सिमस स्पोर्ट्स ॲकॅडमीमध्ये (Maximus Sports Academy) २०१८ पासून बॅडमिंटनचे धडे गिरवणाऱ्या १४ वर्षीय विधी सैनी (Vidhi Saini) हिने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर क्रीडा जगतात नवा इतिहास रचला आहे. विधीने नुकतीच भारतीय बॅडमिंटन संघात (Indian Badminton Team) १५ वर्षांखालील मुलींच्या दुहेरी गटात देशात प्रथम क्रमांक पटकावून अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मुलींच्या दुहेरी गटात प्रथम क्रमांकावर

विधी सैनी ही ऑल इंडिया रँकिंगमध्ये १५ वर्षांखालील मुलींच्या दुहेरी गटात सध्या प्रथम क्रमांकावर विराजमान आहे. अहिल्यानगरमध्ये २०२५मध्ये झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत घरच्या मैदानावर तिने अप्रतिम खेळ करत सुवर्णपदकावर नाव कोरले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये याचवर्षी झालेल्या राज्य निवड चाचणी स्पर्धेत तिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. २०२४मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत तिने राज्याचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक मिळवले होते. मध्यप्रदेशात २०२५मध्ये झालेल्या शालेय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत तिने सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णपदक जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. यंदाच्या वर्षी हैदराबाद, बंगळुरू व जयपूरमध्ये झालेल्या सलग राष्ट्रीय रँकिंग स्पर्धांत कांस्यपदक मिळवून आपली सातत्यपूर्ण कामगिरी कायम ठेवली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आंतरराष्ट्रीय वाटचालीचे संकेत (Vidhi Saini)

मॅक्सिमस स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये गेल्या ८ वर्षांपासून घेतलेले कठोर परिश्रम आणि प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच विधीने हे यश संपादन केले आहे. अत्यंत कमी वयात विधीने राष्ट्रीय पातळीवर मिळवलेले हे यश आगामी काळातील तिच्या आंतरराष्ट्रीय वाटचालीचे संकेत देत आहे.