
The lure of a petrol pump dealership : नगर : जिओ कंपनीची पेट्रोलपंप डीलरशिप व परवाना मिळवून देण्याचे आमिष (The lure of a petrol pump dealership) दाखवत एका व्यक्तीची तब्बल ८४ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या दोन सायबर ठगांना अहिल्यानगर सायबर पोलिसांनी (Ahilyanagar Cyber Police) उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातून ताब्यात घेतले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
संशयित आरोपींची नावे (The lure of a petrol pump dealership)
आकाश सिंह पुत्र पुरण सिंह (वय ३३, रा. इमेलिया, थाना मुस्करा, तहसील मौदहा, जि. हमीरपूर, उत्तर प्रदेश), निलेश कुमार द्विवेदी पुत्र सुरेश द्विवेदी (वय २९, रा. न्युरिया, थाना बिवार, तहसील मौदहा, जि. हमीरपूर, उत्तर प्रदेश), अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.


