
पोलीस अपर अधीक्षकांना ठेविदारांचे निवेदन
Economic Offences Wing : नगर : भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या (Bhagyalaxmi Multistate Co-op. Credit Society) संचालक मंडळ व संबंधित व्यक्तींविरुद्ध दाखल असलेले आर्थिक गैरव्यवहाराचे (Financial Misconduct) सर्व गुन्हे आर्थिक गुन्हे अन्वेषण (Economic Offences Wing) शाखेकडे वर्ग करून सखोल तपास करावा, अशी मागणी सोसायटीच्या ठेवीदारांनी अपर पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच संस्थेच्या संचालक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, एजंट, ब्रोकर तसेच आर्थिक व्यवहारात सहभागी असलेल्या व्यक्तींची भूमिका तपासावी. तपासात दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे.
पैशांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचे गुन्हे दाखल
भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळ व संबंधित व्यक्तींविरुद्ध ठेवीदारांच्या पैशांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचे गुन्हे दाखल आहेत. यातील एका प्रकरणात १० सप्टेंबर २०२४ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊन बराच कालावधी उलटूनही ठेवीदारांना त्यांच्या कष्टाच्या पैशांबाबत अद्याप दिलासा मिळालेला नसल्याने ठेवीदारांमध्ये नाराजी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
तांत्रिक पद्धतीने तपास होणे आवश्यक (Economic Offences Wing)
या प्रकरणाचे स्वरूप आर्थिक असल्याने त्याचा सखोल व तांत्रिक पद्धतीने तपास होणे आवश्यक आहे. त्यामुळे सोसायटीच्या आर्थिक व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करून ठेवीदारांच्या पैशांचा वापर नेमका कुठे आणि कशा प्रकारे झाला, याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संस्थेच्या संचालक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, एजंट, ब्रोकर तसेच आर्थिक व्यवहारात सहभागी असलेल्या व्यक्तींची भूमिका तपासावी. तपासात दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे.
आरोपींच्या बँक खात्यांमधील व्यवहार, आर्थिक उलाढाल तसेच स्थावर-जंगम मालमत्तेची चौकशी करावी. आर्थिक गैरव्यवहारातून मिळविल्याचे तपासात निष्पन्न होणारी मालमत्ता शोधून संबंधित कायद्यानुसार जप्तीची कार्यवाही करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
आरोपींनी मालमत्ता इतर व्यक्तींच्या नावावर हस्तांतरित केली आहे का, याचीही चौकशी करून तसे आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी. सोसायटीच्या संचालकांविरुद्ध दाखल असलेले सर्व आर्थिक स्वरूपाचे गुन्हे एकत्रित करून त्यांचा सखोल तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करावा, अशी ठेवीदारांची प्रमुख मागणी आहे.
दरम्यान ठेवीदार गेल्या दोन वर्षांपासून आपल्या हक्काच्या पैशांसाठी संघर्ष करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत फॉरेन्सिक ऑडिटसह संपूर्ण तपास करावा आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


