
Pyare Jiya Khan : अल्पसंख्याक समाजासाठी (Minority Community) शासनाच्या विविध योजनांची (Various Government Schemes) प्रभावी अंमलबजावणी करून त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा, तसेच प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत, या मागणीसाठी मिशन सेफ विहार ग्रुपचे अध्यक्ष इंजि. यश प्रमोद शहा यांनी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष तथा मंत्री प्यारे जिया खान (Pyare Jiya Khan) यांच्याकडे निवेदन सादर केले.
गंभीर आजारात आयोगा मार्फत आर्थिक मदतीची मागणी
निवेदनात जैन साधू-साध्वी व गुरु भगवंतांना विहारादरम्यान प्रभावी पोलीस सुरक्षा देण्यासाठी राज्यस्तरावर आदेश काढावेत, विहारधामसाठी जागा व निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच गंभीर आजारांनी त्रस्त अल्पसंख्याक रुग्णांना आयोगा मार्फत विशेष आर्थिक मदत मिळावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
योजनांसाठी उत्पन्न मर्यादा ८ लाखांपर्यंत करावी (Pyare Jiya Khan)
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना साठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि कर्ज योजना प्रभावीपणे राबवाव्यात, अल्पसंख्याक प्रमाणपत्र शासनामार्फत प्रत्येक जिल्ह्यात दिले जावे , सर्व योजनांसाठी उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत करावी आणि प्रलंबित अल्पसंख्याक समितीवरील अशासकीय सदस्यांची नियुक्ती करावी, अशीही मागणी करण्यात आली. योजनांच्या पाठपुराव्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्याचीआग्रही मागणी करण्यात आली.
दरम्यान, जैन गुरु भगवंतांना पोलीस सुरक्षा उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अल्पसंख्यांक मंत्री , पालकमंत्री, महाराष्ट्र पोलिस आणि विशेष आभार अल्पसंख्यांक आयोग, जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलिस प्रशासन यांचे आभार मानण्यात आले. यश शहा , लहान वयात करत असलेल्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक अध्यक्षांनी आवर्जून यावेळी केले . अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी शहा यांच्या मागण्यांची सकारात्मक दखल घेत आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन देत, तत्काळ संबंधित अधिकारी यांना कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या.


