Varsha Usgaonkar : ‘वर्षारंग’मधून उलगडणार वर्षा उसगावकरांचा ४० वर्षांचा रंगीबेरंगी प्रवास; ८६ खास छायाचित्रांचा अनोखा नजराणा

Varsha Usgaonkar : ‘वर्षारंग’मधून उलगडणार वर्षा उसगावकरांचा ४० वर्षांचा रंगीबेरंगी प्रवास; ८६ खास छायाचित्रांचा अनोखा नजराणा

0
Varsha Usgaonkar : ‘वर्षारंग’मधून उलगडणार वर्षा उसगावकरांचा ४० वर्षांचा रंगीबेरंगी प्रवास; ८६ खास छायाचित्रांचा अनोखा नजराणा
Varsha Usgaonkar : ‘वर्षारंग’मधून उलगडणार वर्षा उसगावकरांचा ४० वर्षांचा रंगीबेरंगी प्रवास; ८६ खास छायाचित्रांचा अनोखा नजराणा

Varsha Usgaonkar : मराठी मनोरंजनसृष्टीतील (Marathi Entertainment Industry) प्रसन्न व्यक्तिमत्त्व, सौंदर्य, नृत्यकौशल्य आणि अष्टपैलू अभिनयासाठी लोकप्रिय असलेल्या अभिनेत्री वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांच्या कारकिर्दीचा अनोखा छायाचित्रमय प्रवास आता ‘कॉफी टेबल बुक’च्या रूपात वाचकांच्या भेटीला आला आहे. ‘वर्षारंग’ (Varsharang) या नावाने प्रकाशित झालेल्या या संग्राह्य पुस्तकात वर्षा उसगावकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि चार दशकांच्या यशस्वी कलाप्रवासाचे दर्शन घडते.

केली स्वतंत्र ओळख केली निर्माण

चित्रपट, रंगभूमी, मालिका, जाहिरात आणि गायन अशा विविध माध्यमांमध्ये वर्षा उसगावकर यांनी गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या प्रवासातील विविध पैलू तब्बल ८६ रंगीत आणि आकर्षक छायाचित्रांमधून ‘वर्षारंग’मध्ये टिपण्यात आले आहेत. त्यामुळे हे पुस्तक केवळ अभिनेत्रीच्या कारकिर्दीचा दस्तऐवज न राहता, त्यांच्या उत्स्फूर्त व्यक्तिमत्त्वाचा आणि पडद्यामागच्या विविध रंगांचा वेध घेणारा ठरतो.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

७२ पृष्ठांच्या या कॉफी टेबल बुकची निर्मिती (Varsha Usgaonkar)

७२ पृष्ठांच्या या कॉफी टेबल बुकची निर्मिती पुण्यातील नीलकंठ प्रकाशनने केली आहे. अभिनेता उदय टिकेकर यांनी पुस्तकाला प्रस्तावना लिहिली असून, ‘संवाद, पुणे’च्या सुनील महाजन आणि निकिता मोघे यांची संकल्पना व निर्मिती आहे. चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर यांनी पुस्तकाचे लेखन केले आहे. तर मुखपृष्ठ सजावट श्रद्धा आणि जयदीप कडू यांनी केली आहे.

वर्षा उसगावकर यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वासोबतच त्यांची मेहनत, सकारात्मक दृष्टिकोन, सौंदर्य आणि नृत्याची आवड या विविध पैलूंचाही ‘वर्षारंग’मधून मागोवा घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चित्रपटसृष्टीवरील अनेक पुस्तकांच्या गर्दीत हे पुस्तक आपल्या छायाचित्रप्रधान मांडणीमुळे वेगळे ठरते.

किती आहे पुस्तकाची किंमत?

‘वर्षारंग’ या संग्राह्य कॉफी टेबल बुकची किंमत ६०० रुपये असून, पुण्यातील ज्ञानाई बुक कॅफे, डेक्कन येथे हे पुस्तक उपलब्ध आहे.

संपर्क : 96898 25751 / 94211 78804

४० वर्षांचा प्रवास… ८६ छायाचित्रांत!

वर्षा उसगावकर यांच्या अभिनयापासून नृत्यापर्यंत, ग्लॅमरपासून त्यांच्या उत्स्फूर्त व्यक्तिमत्त्वापर्यंत आणि कारकिर्दीतील विविध टप्प्यांपासून आजवरच्या यशस्वी वाटचालीपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या दृक्-अनुभवातून मांडण्याचा प्रयत्न *‘वर्षारंग’*मधून करण्यात आला आहे. त्यामुळे वर्षा उसगावकर यांच्या चाहत्यांसाठी आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रस असणाऱ्या वाचकांसाठी हे पुस्तक निश्चितच संग्राह्य ठरणारे आहे.