Avengers Endgame: Encore : चाहते पुन्हा एकदा सज्ज! ‘Avengers Endgame: Encore’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला भारतात जोरदार प्रतिसाद

Avengers Endgame: Encore : चाहते पुन्हा एकदा सज्ज! ‘Avengers Endgame: Encore’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला भारतात जोरदार प्रतिसाद

0
Avengers Endgame: Encore : चाहते पुन्हा एकदा सज्ज! ‘Avengers Endgame: Encore’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला भारतात जोरदार प्रतिसाद
Avengers Endgame: Encore : चाहते पुन्हा एकदा सज्ज! ‘Avengers Endgame: Encore’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला भारतात जोरदार प्रतिसाद

Avengers Endgame: Encore : मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या (Marvel Cinematic Universe) चाहत्यांसाठी मोठी पर्वणी येत असून, ‘Avengers : Endgame’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘‘Avengers Endgame Encore’ या नावाने हा चित्रपट 25 सप्टेंबर रोजी भारतात इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, प्रदर्शनाला अद्याप काही दिवस शिल्लक असतानाच चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला (Movie advance bookings) जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मर्यादित स्क्रीन्सवर बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत 8 हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाल्याचे सांगण्यात आले आहे.

‘Avengers: Doomsday’साठी वातावरणनिर्मिती करणार

‘Avengers Endgame: Encore’ हा ‘Avengers: Endgame’चा पुनर्प्रदर्शित अवतार असून, आगामी ‘Avengers: Doomsday’साठी वातावरणनिर्मिती करणारा ठरणार आहे. भारतात पुनर्प्रदर्शित होणाऱ्या हॉलिवूड चित्रपटासाठी 14 दिवस आधीच बुकिंग सुरू होणे आणि त्याला मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय मानला जात आहे. सध्याचा प्रतिसाद पाहता भारतातील हॉलिवूड चित्रपटांच्या पुनर्प्रदर्शनामध्ये सर्वात मोठी ओपनिंग नोंदवण्याच्या दिशेने हा चित्रपट वाटचाल करत असल्याचे म्हटले जात आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पुन्हा पडद्यावर अनुभवण्यासाठी उत्सुकता (Avengers Endgame: Encore)

मार्व्हल स्टुडिओजने या चित्रपटाचे बुकिंग IMAX, Marvel Studios’ Infinity Vision तसेच 4DX, MX4D, SCREENX, Dolby Vision, HDR Barco आणि ICE यांसारख्या प्रीमियम फॉरमॅट्ससाठी सुरू केले आहे. विशेषतः प्रीमियम फॉरमॅट्सच्या बुकिंगला मिळणारा प्रतिसाद पाहता MCU चा प्रवास बदलून टाकणाऱ्या ‘Endgame’मधील घटनांचा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभव घेण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर आगामी ‘Avengers: Doomsday’मध्ये Doctor Doom काय करणार, याबाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

‘Infinity Vision’ प्रमाणित स्क्रीन्सवर मोठा पडदा, अधिक उजळ चित्र आणि प्रभावी ध्वनीच्या माध्यमातून प्रेक्षकांना अधिक भव्य सिनेमॅटिक अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे ‘Endgame’चा क्लायमॅक्स पुन्हा एकदा प्रीमियम थिएटर फॉरमॅटमध्ये अनुभवण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.

‘Avengers Endgame: Encore’च्या कथेत जगातील निम्मी लोकसंख्या नष्ट करणाऱ्या विनाशकारी घटनांनंतर उरलेले सुपरहिरो पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र अखेर आपल्या प्रियजनांना परत आणण्यासाठी आणि विश्वातील संतुलन पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सर्व Avengers एकत्र येतात आणि Thanos विरोधात निर्णायक लढाई लढतात.

या चित्रपटाची निर्मिती Kevin Feige यांनी केली असून Anthony Russo आणि Joe Russo यांनी दिग्दर्शन केले आहे. Louis D’Esposito, Victoria Alonso, Michael Grillo, Trinh Tran, Jon Favreau, James Gunn आणि Stan Lee हे कार्यकारी निर्माते आहेत. आता 25 सप्टेंबरला ‘Avengers Endgame: Encore’ पुन्हा मोठ्या पडद्यावर येत असताना भारतीय बॉक्स ऑफिसवर पुनर्प्रदर्शनाचे नवे विक्रम प्रस्थापित करणार का, याकडे MCU चाहत्यांचे लक्ष लागले आहे.