Local Crime Branch : जिल्ह्यात गुटखा विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; सात जणांविरुद्ध तीन गुन्हे दाखल

जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना

0
Local Crime Branch : जिल्ह्यात गुटखा विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; सात जणांविरुद्ध तीन गुन्हे दाखल
Local Crime Branch : जिल्ह्यात गुटखा विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; सात जणांविरुद्ध तीन गुन्हे दाखल

Local Crime Branch : नगर : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गुटखा, मावा आणि सुगंधित तंबाखूच्या विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत पाथर्डी, कोपरगाव आणि लोणी पोलीस ठाण्यांच्या (Loni Police Station) हद्दीत तीन ठिकाणी छापे टाकून सात जणांविरुद्ध तीन स्वतंत्र गुन्हे दाखल (Cases Registered) करण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३४ हजार ९७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

नक्की वाचा : कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षासह मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीस घातला चपलांचा हार

संशयित ठिकाणी छापे

जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दोन पथके तयार केली. या पथकांना जिल्ह्यातील गुटखा, मावा व सुगंधित तंबाखूची अवैध विक्री करणाऱ्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार १४ सप्टेंबर रोजी पाथर्डी, कोपरगाव तालुका आणि लोणी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संशयित ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत सुगंधित तंबाखू व गुटखा तयार करून विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यांच्यावर गुन्हा दाखल (Local Crime Branch)

पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात शैलेश नारायण भताणे (रा. देवराई, ता. पाथर्डी) याला ताब्यात घेण्यात आले असून, किरण नरसाळे आणि इरफान शेख, विनायक वामनराव होन, वय ५२, रा.चांदे कसारे, ता.कोपरगाव, जि.अहिल्यानगर), जावेद शेख पुर्ण नाव माहित नाही, रा.निमगाव, ता.राहाता जि.अहिल्यानगर), आबासाहेब सोपान बोरूडे, वय २८, रा.कोल्हार, ता.राहाता), नवाब शेख, पुर्ण नाव माहित नाही, राहुरी, ता.राहुरी, जि.अहिल्यानगर), यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही करावाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, विकास साळवे, अशोक लिपणे, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब नागरगोजे, अजिनाथ पाखरे, गणेश लोंढे, निळकंठ कारखेले, रणजीत जाधव, सतीष भवर, प्रकाश मांडगे यांच्या पथकाने केली.