District Central Cooperative Bank : जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; ‘पिशवीतील’159 मतदार वधारले

अंतिम मतदार यादीची आकडेवारी प्रसिद्ध

0
District Central Cooperative Bank : जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; 'पिशवीतील'159 मतदार वधारले
District Central Cooperative Bank : जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; 'पिशवीतील'159 मतदार वधारले

District Central Cooperative Bank : नगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (District Central Cooperative Bank) आगामी निवडणुकीसाठी सहकार व बँक निवडणूक अधिकार्‍यांनी (Bank Election Officer) आज (ता. 15) सायंकाळी अंतिम मतदार यादी (Voter List) प्रसिद्ध करण्यात आली. या अंतिम यादीत प्रारूप मतदार यादीच्या तुलनेत 159 मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील एकूण मतदारांची संख्या 3 हजार 836 वर पोहोचली आहे.   

नक्की वाचा : जिल्ह्यात गुटखा विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; सात जणांविरुद्ध तीन गुन्हे दाखल

अंतिम मतदार यादीची आकडेवारी प्रसिद्ध

जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांनी मंगळवारी दुपारीच अंतिम मतदार यादी जाहीर झाल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात यादी जाहीर झाली की नाही याबाबत सहकार विभागाकडून अधिकृत माहिती दिली गेली नाही. त्यानंतर सायंकाळी उशीरा सहकार विभाग व बँकेच्यावतीने मतदारसंघनिहाय प्रारूप मतदार यादी व अंतिम मतदार यादीची आकडेवारी देण्यात आली. यात प्रारूप मतदार यादीत सोसायटीचे मतदार 1360 होते तेच अंतिम यादी एवढेच मतदार राहिले. मात्र बिगर शेती मतदारसंघात तब्बल 161 मतदार वाढले. त्यात बिगर शेतीसाठी प्रारूपमध्ये 1501 मतदार होते. त्यात 91 मतदार वाढले. त्यामुळे बिगर शेती मतदारसंघात 1592 एकूण मतदार झाले आहेत. तसेच कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्था (शेती पुरक मतदारसंघात 816 मतदार प्रारूप यादी होते ते आता 884 झाले आहेत. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

161 हरकती मान्य (District Central Cooperative Bank)

या मतदारसंघात 68 मतदार वाढले आहेत. हे दोन्ही मतदारसंघात पिवशीतील मतदार आहे. त्यामुळे या मतदार वाढीचा कोणाला फायदा होणार हे निवडणुकीत दिसून येईल. बँकेच्या निवडणुकीसाठी सेवा सोसायटी मतदारसंघ, बिगरशेती मतदारसंघ आणि शेती पूरक मतदारसंघातून 3 हजार 647 आणि 30 व्यक्तीगत असे 3 हजार 677 मतदार निश्‍चित झाले होते. प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप यादीवर 238 हरकती दाखल झाल्या होत्या. यात सर्वाधिक 123 हरकती एकट्या संगमनेर तालुुक्यातील होत्या. या 238 हरकतीवर 10 सप्टेंबरपर्यंत सुनावणी झाली. त्यातून 161 हरकती मान्य होऊन त्यांना मतदानाचा अधिकारी देण्यात आहे. त्यामुळे 238 पैकी 77 हरकती निकाली काढण्यात आल्याचे आढळून आले आहे.

नगर जिल्ह्याच्या राजकारणात पिशवीतील मतदार हा शब्द हक्काच्या मतदार या साठी वापरला जातो. सहकारी संस्था निवडणुकीत नेते मंडळी आधीच आपले हक्काचे मतदार नोंदणी करून घेतात, त्यांच्या जोरावर निवडणुकीची गणिते जुळवून जिंकतात. त्यासाठी पिशवीतील मतदार महत्वाचे मानले जातात.
जर जिल्हा बँकेची निवडणूक झाली तर चुरशीची होणार आहे. त्यामुळे एक एक महत्वाचे ठरु शकते. त्यामुळे मतदार ठराव करताना आणि नोंदणी करताना नेत्यांनी आपले आपले मतदार केले. आता हरकती सूचना मधून आणखी १५९ मतदार वाढले आहेत.