Karjat Nagar Panchayat : कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षासह मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीस घातला चपलांचा हार

भास्कर भैलुमे यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

0
Karjat Nagar Panchayat : कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षासह मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीस घातला चपलांचा हार
Karjat Nagar Panchayat : कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षासह मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीस घातला चपलांचा हार

Karjat Nagar Panchayat : कर्जत : प्रशासनाने सर्व नियमांची पायमल्ली करून कर्जत नगरपंचायतीमधील (Karjat Nagar Panchayat) दलित वस्तीच्या निधीचा उघड गैरवापर (Misuse) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत अपात्र ठरलेले नगरसेवक भास्कर भैलुमे (Bhaskar Bhailume) यांनी मंगळवारी (ता.१५) पदाधिकारी-प्रशासनाच्या गैरव्यवहाराच्या विरोधात नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला चपलांचा हार घातला.

नक्की वाचा : पाथर्डीत भरदुपारी ट्रकचालक, क्लिनरला मारहाण; शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह

शासन निर्णयाला हरताळ

शासकीय नियमांनुसार दलित वस्तीचा निधी राखीव प्रभाग सोडून इतरत्र खर्च करायचा असल्यास ५० टक्क्यांपेक्षा जास्त मागासवर्गीय लोकसंख्या असलेल्या प्रभागांमध्ये उतरत्या क्रमाने निधी खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र कर्जत नगरपंचायतीने सामाजिक न्याय विभागाच्या या शासन निर्णयाला पूर्णपणे हरताळ फासत निधीचे बेकायदेशीर वाटप केल्याचा गंभीर आरोप भास्कर भैलुमे यांच्यासह आंदोलकांनी केला. दलितवस्ती निधीच्या कथित काळाबाजार आणि उघड गैरव्यवहाराच्या विरोधात मंगळवारी कर्जत नगरपंचायतीमध्ये संतापाचा तीव्र उद्रेक पाहायला मिळाला. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

भास्कर भैलुमे यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित (Karjat Nagar Panchayat)

वास्तविक पाहता प्रशासनाला जाग आणण्यासाठी आठ दिवसांपूर्वीच निवेदन देण्यात आले होते. मात्र तरीही प्रशासन आणि जबाबदार पदाधिकारी गैरहजर राहिल्याने संतप्त आंदोलकांनी थेट नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला चपलाचा हार घालून तीव्र निषेध नोंदवत नगरपंचायतीच्या आवारात हलगीच्या कडकडाटात ठिय्या आंदोलन केले. सध्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातून मनोज जरांगे हे मुबंईच्या दिशेने जात असल्याने स्थानिक पोलीस प्रशासन त्यात व्यस्त आहे. कायदा-सुव्यवस्थेच्यादृष्टीने भास्कर भैलुमे यांनी आजचे आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र यावर योग्य ती कार्यवाही न झाल्यास आगामी काळात राजकीय पदाधिकाऱ्यांसह प्रशासनास आत कोंडून टाळे ठोकण्याचा इशारा दिला.