Assault On Truck Driver And Cleaner : पाथर्डीत भरदुपारी ट्रकचालक, क्लिनरला मारहाण; शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह

पाथर्डी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल

0
Assault On Truck Driver And Cleaner : पाथर्डीत भरदुपारी ट्रकचालक, क्लिनरला मारहाण; शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह
Assault On Truck Driver And Cleaner : पाथर्डीत भरदुपारी ट्रकचालक, क्लिनरला मारहाण; शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह

Assault On Truck Driver And Cleaner : पाथर्डी : भरदुपारी पाथर्डी शहरातील (Pathardi city) विजय हनुमान मंदिर परिसरातील पोळा मारुतीजवळ तीन ते चार युवकांनी सोमवारी (ता. १४)  ट्रकचालक व क्लिनरला लाकडी दांड्याने व दगडाने मारहाण (Assault) करून जखमी (Injured) केल्याची घटना घडली. या हल्ल्यात ट्रकच्या काचाही फोडण्यात आल्या. सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या या मारहाणीमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नक्की वाचा : राहाता तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अन्यथा आंदोलन; काँग्रेसचा इशारा

पाथर्डी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल

ट्रकचालक आप्पा फारुण शेख (रा. घोडेगाव, ता. नेवासा) व त्यांचा सहकारी क्लिनर हे खरवंडीच्या दिशेने पाथर्डीकडे येत असताना पोळा मारुतीजवळ हा प्रकार घडला. अचानक तीन ते चार युवकांनी ट्रक अडवून दोघांवर हल्ला चढविला. लाकडी दांडे व दगडांचा वापर करून त्यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये शेख हे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले, तर ट्रकचा क्लिनर (नाव माहिती नाही ) यालाही दुखापत झाली. भरदुपारी रस्त्यावर सुरू असलेला हा प्रकार ये-जा करणारे नागरिक व वाहनधारक पाहत होते. एका दांपत्याने हल्लेखोर युवकांना आवरण्याचा प्रयत्न केला; मात्र युवकांनी कोणाचेही न ऐकता मारहाण सुरूच ठेवली. अखेर काही सुज्ञ नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पाथर्डी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

हल्लेखोर घटनास्थळावरून पसार (Assault On Truck Driver And Cleaner)

 पोलीस येत असल्याचे समजताच हल्लेखोर तेथून पसार झाले. जखमींना उपचारासाठी पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आप्पा शेख यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले असून ट्रकच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. हा सर्व प्रकार अनेक नागरिकांच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. ट्रकचालक व क्लिनरला एवढी अमानुष मारहाण करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोर पाथर्डी शहरातील असून त्यांनी ट्रक का अडविला आणि मारहाणीचे कारण काय, याचा तपास पाथर्डी पोलिसांकडून सुरू आहे.