Employment Mega-Fair : पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभासाठी उमेदवारांना पूर्व मुलाखत प्रशिक्षण

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शेवगाव येथे दि. २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान प्रशिक्षण

0
Employment Mega-Fair : पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभासाठी उमेदवारांना पूर्व मुलाखत प्रशिक्षण
Employment Mega-Fair : पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभासाठी उमेदवारांना पूर्व मुलाखत प्रशिक्षण

Employment Mega-Fair : नगर : महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभाचे (Pandit Deendayal Upadhyay Employment Mahakumbh) आयोजन २९ सप्टेंबर रोजी शेवगाव येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित औद्योगिक आस्थापना (Industrial Establishment) सहभागी होणार आहेत.

या विषयांवर मार्गदर्शन

या रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या गरजू उमेदवारांसाठी दि. २१ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शेवगाव येथे पूर्व मुलाखत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.या प्रशिक्षणामध्ये रोजगार मेळाव्याची ओळख व करिअर जागरूकता, Resume/CV प्रभावी स्वरूपात तयार करणे, मुलाखत कौशल्ये व Mock Interview, व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य, कार्यस्थळ सज्जता व व्यावसायिक वर्तन, क्षेत्रनिहाय कौशल्य अभिमुखता तसेच अंतिम पूर्वतयारी व Candidate Checklist या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मुलाखतीनंतर जागेवरच निवडपत्र देण्यात येणार (Employment Mega-Fair)

जास्तीत जास्त गरजू उमेदवारांनी या पूर्व मुलाखत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी उमेदवारांनी https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 या लिंकवर नोंदणी करावी. रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीनंतर जागेवरच निवडपत्र (Offer Letter) देण्यात येणार असल्याची माहिती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शेवगाव यांच्याकडून देण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शेवगाव येथे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.