Balasaheb Thorat : हक्काचे पाणी व विजेच्या संघर्षासाठी तयार रहा : बाळासाहेब थोरात

कारखाना व दूध संघ सर्वांची दिवाळी गोड करणार

0
Balasaheb Thorat : हक्काचे पाणी व विजेच्या संघर्षासाठी तयार रहा : बाळासाहेब थोरात
Balasaheb Thorat : हक्काचे पाणी व विजेच्या संघर्षासाठी तयार रहा : बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat : संगमनेर : निळवंडे धरण (Nilwande Dam) व कालवे आपण पूर्ण केले. आता कालव्यांना कॉंक्रिटीकरण (concreting Work) करून करून पाणी पुढे नेले जात आहे. आपल्या काळामध्ये ११ तास पूर्ण दाबाने वीज असायची. आता वीज बंद केली जात आहे. पाणी ,वीज, रेल्वे या प्रश्नांवरती येथील लोकप्रतिनिधीने बोलले पाहिजे. मात्र ते कुणाच्यातरी नियंत्रणाखाली काम करत असल्याने बोलू शकत नाही. हे तालुक्याचे दुर्दैव आहे. पाण्यामुळे समृद्धी येत असून आपल्यालाच लढावे लागणार आहे. हक्काच्या पाण्यासाठी व सुरळीत वीजपुरवठा मिळाला पाहिजे याकरता संघर्षासाठी तयार रहा असे आवाहन राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी तालुक्यातील जनतेला केले असून यावर्षी साखर कारखाना व दूध संघ सर्वांची दिवाळी गोड करणार असल्याचे ते म्हणाले आहे.

नक्की वाचा : पठारे बंधूंविरुद्ध २ हजार २४१ पानी मोक्का पुरवणी दोषारोपपत्र दाखल

Balasaheb Thorat : हक्काचे पाणी व विजेच्या संघर्षासाठी तयार रहा : बाळासाहेब थोरात
Balasaheb Thorat : हक्काचे पाणी व विजेच्या संघर्षासाठी तयार रहा : बाळासाहेब थोरात

यांची उपस्थिती

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 59 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, दुर्गा तांबे, रणजीत सिंह देशमुख, शंकरराव खेमनर ,सुधाकर जोशी, डॉ जयश्री थोरात, बुवाजी बाबा पुणेकर, शरद नाना थोरात, मधुकरराव नवले, आर.बी राहणे, रामदास वाघ, गणपतराव सांगळे, कारखान्याचे संचालक संतोष हासे, इंद्रजीत भाऊ थोरात, इंद्रजीत खेमनर, संपतराव गोडगे, डॉ. तुषार दिघे, विनोद, सतीश वर्पे, रामदास धुळगंड, विलास शिंदे, रामनाथ कुटे, नवनाथ आरगडे, विजय राहणे, गुलाब देशमुख, अरुण वाकचौरे ,योगेश भालेराव ,अंकुश ताजने, दिलीप नागरे, लताताई गायकर, सुंदराबाई दुबे, बंडू नाना भाबड, मदन आंबरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मा मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, 800 टन मॅट्रिक टनावरून सुरू झालेल्या कारखान्याने 59 वर्षात विस्तारीकरणासह डिस्टलेरी, इथेनॉल, वीज निर्मिती यातून अत्यंत यशस्वी वाटचाल केली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे आदर्श तत्व तंतोतंत जपताना काटकसर पारदर्शकता हे कारखान्याचे वैशिष्ट्य राहिले आहे. कारखान्याबरोबरच दूध संघ, शैक्षणिक संस्था या सर्वांचे आदर्शवत काम सुरू आहे . हे सर्व यश प्रामाणिकपणामुळे आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

Balasaheb Thorat : हक्काचे पाणी व विजेच्या संघर्षासाठी तयार रहा : बाळासाहेब थोरात
Balasaheb Thorat : हक्काचे पाणी व विजेच्या संघर्षासाठी तयार रहा : बाळासाहेब थोरात

प्रत्येक संस्थेचे उत्कृष्ट काम (Balasaheb Thorat)

दूध संघ चांगला भाव देतो आहे. त्यामुळे खाजगीवाले चांगले भाव देतात. प्रत्येक संस्था उत्कृष्ट काम करते. निळवंडे चे पाणी आल्याने उसाचे क्षेत्र वाढले पाहिजे याचबरोबर एकरी शंभर टनेज ऊस उत्पादन होईल यासाठी शेतकऱ्यांनी काम करावे. कार्यक्षेत्रामध्ये 11 लाख ऊस निर्मिती होणे गरजेचे आहे. स्वतःचा ऊस आपण निर्माण केल्यास राज्यातील सर्वाधिक भाव कायम आपण देऊ. आपली चांगल्या कामाची परंपरा आपली राहिली आहे. बाहेरील शेतकरी ,सभासद, ऊस उत्पादक यांचा मोठा विश्वास कारखान्यावर आहे. ऊस वाढीसाठी ऊस विकास मेळावे घेण्यात येत आहे.

पाण्यासाठी संघर्ष

चाळीस वर्षांमध्ये अविश्रांत कामातून तालुका प्रगतशील बनवला. राज्यातील पहिल्या पाच तालुक्यांमध्ये संगमनेरचा समावेश होतो आहे. मात्र कोणीतरी उठतो आणि काय केले असा सवाल विचारतो. निष्क्रिय मुले ही वडिलांना असाच सवाल विचारतात. त्यांनी काय केले ते पहा. तालुक्यामध्ये पाणी वीज रेल्वे हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यावर नवीन लोकप्रतिनिधी एक शब्द बोलत नाहीये दुर्दैव आहे.आपल्या तालुक्याचा पाण्यासाठी संघर्ष आहे. 1985 मध्ये जनतेने हक्काच्या पाण्यासाठीच आपल्याला निवडून दिले. सलग आठ वेळेस मोठ्या मताधिक्याने निवडून आलो. निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले त्यावेळेस कोणी मदत केली नाही. आता कालव्यांना काँक्रिटीकरण करून पाणी पुढे नेले जात आहे. आपल्या काळामध्ये सलग अकरा तास वीज असायची आता विजेचा पूर्ण खेळखंडोबा झाला आहे. वीज जाते म्हणजे पाणी पुढे जाते. वाळू मुरूम यापेक्षा त्यांचे दुसरीकडे कुठे लक्ष नाही त्यामुळे आता पाण्यासाठी आपल्यालाच संघर्ष करावा लागणार आहे.

त्यांची भाषा उध्वस्त करण्याची

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टातून या सहकारी संस्था उभ्या केल्या आहेत. ह्या शेतकऱ्यांच्या सोन्याच्या संस्था आहेत. त्या उध्वस्त करण्याची भाषा ते लोक करत आहेत. हा सहकार मोडू पाहत आहेत. त्यांची भाषा उध्वस्त करण्याची आहे. ही संस्कृती आपल्याकडे कधीही नव्हती म्हणून तालुक्याच्या समृद्धीसाठी पाणी महत्त्वाचे असून पाणी व वीज मिळवण्यासाठी संघर्षासाठी तयार राहा असे आवाहन त्यांनी केले.याचबरोबर साखर कारखानदारी मधून दरवर्षी केंद्र व राज्य सरकारला सुमारे आठ हजार कोटी रुपये मिळतात. दहा वर्षातून एकदा या व्यवसायात अडचणी निर्माण होतात .अशा काळात सरकारने साखर कारखान्यांना मदत केली पाहिजे. कारखाने हे शेतकरी आणि ग्रामीण भागाशी निगडित असतात. काही निर्णय झाले आहे परंतु ते अपेक्षित नाही त्यामुळे सरकारने साखर कारखानदारीला मदत करावी असे आवाहनही त्यांनी राज्य सरकारला केले आहे.

यावेळी सभासदांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी उत्तरे दिली. या सभेचे नोटीस वाचन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले तर व्हा.चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी आभार मानले. यावेळी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी कारखान्याचे सभासद ,शेतकरी ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सर्वाधिक एकरी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.