Charge sheet filed : पठारे बंधूंविरुद्ध २ हजार २४१ पानी मोक्का पुरवणी दोषारोपपत्र दाखल

आरोपींविरुद्ध सबळ पुरावे संकलित

0
Charge sheet filed : पठारे बंधूंविरुद्ध २ हजार २४१ पानी मोक्का पुरवणी दोषारोपपत्र दाखल
Charge sheet filed : पठारे बंधूंविरुद्ध २ हजार २४१ पानी मोक्का पुरवणी दोषारोपपत्र दाखल

Charge sheet filed : नगर : तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्यात विजय राजू पठारे आणि अजय राजू पठारे या दोघांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) (MCOCA) अंतर्गत २ हजार २४१ पानी पुरवणी दोषारोपपत्र (Charge sheet filed) विशेष मोक्का न्यायालयात दाखल करण्यात आले. १७ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. तोफखाना पोलीस ठाण्यात १५ मार्च २०२६ रोजी विजय पठारे, अजय पठारे, किरण मोहन जेधिया, सनी रणजित चावरे आणि निलेश बाबासाहेब ससाणे (सर्व रा. सिद्धार्थनगर, अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध विविध कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नक्की वाचा : नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून नाशिक विभागात राबविण्यात येणार सेवा संकल्प अभियान

आरोपींनी संघटितपणे गुन्हे केल्याचा आरोप

पोलिसांच्या माहितीनुसार, या आरोपींविरुद्ध अहिल्यानगर शहरातील तोफखाना, कोतवाली आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांमध्ये शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्धचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी संघटितपणे गुन्हे केल्याचा पोलिसांचा आरोप असून, त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर २० जून २०२६ रोजी मूळ गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कलम वाढविण्यात आले. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास नगर शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्याकडे सोपविण्यात आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आरोपींविरुद्ध सबळ पुरावे संकलित (Charge sheet filed)

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींविरुद्ध सबळ पुरावे संकलित केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर विजय पठारे आणि अजय पठारे यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे मंजुरीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी दोन्ही आरोपींविरुद्ध अहिल्यानगर येथील विशेष मोक्का न्यायालयात २ हजार २४१ पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, विजय राजू पठारे याच्याविरुद्ध एकूण नऊ, तर अजय राजू पठारे याच्याविरुद्ध पाच गुन्हे दाखल आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. दिलीप टिपरसे यांनी या प्रकरणाचा तपास केला.