Youth attacked with a knife : किरकोळ वादातून तरुणावर चाकूने हल्ला; पाच जणांविरुद्ध शेवगाव पोलिसांत गुन्हा दाखल

Youth attacked with a knife : किरकोळ वादातून तरुणावर चाकूने हल्ला; पाच जणांविरुद्ध शेवगाव पोलिसांत गुन्हा दाखल

0
Youth attacked with a knife : किरकोळ वादातून तरुणावर चाकूने हल्ला; पाच जणांविरुद्ध शेवगाव पोलिसांत गुन्हा दाखल
Youth attacked with a knife : किरकोळ वादातून तरुणावर चाकूने हल्ला; पाच जणांविरुद्ध शेवगाव पोलिसांत गुन्हा दाखल

Youth attacked with a knife : शेवगाव : शेवगाव शहरातील वरुड चौक–आखेगाव रस्त्यावर वडिलांसोबत झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून तरुणासह त्याच्या वडिलांना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण (Assault) केल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी पाच जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. यातील एका आरोपीने चाकूने पोटावर वार (Youth attacked with a knife) करून गंभीर दुखापत (Serious injury) केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम मच्छिंद्र कोरडे (वय २०, रा. कोरडे वस्ती, शेवगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. संजय फडके, रोहन संजय फडके व ओम वाळके (तिघे रा. खंडोबा नगर, शेवगाव) तसेच राजू धनवडे व कृष्णा धनवडे (दोघे रा. वडारगल्ली, शेवगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, (Youth attacked with a knife)

१५ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपी एकत्र आले. वडिलांसोबत झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून त्यांनी फिर्यादी व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, आरोपी क्रमांक दोन रोहन फडके याने हातातील चाकूने फिर्यादीचे वडील मच्छिंद्र रामनाथ कोरडे यांच्या पोटावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील साईदीप रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७३९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), १८९(२), १९१(२), १९१(३) व १९० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार चाकू असल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले तपास करीत आहेत. फिर्यादीने १७ सप्टेंबर रोजी तक्रार दिल्यानंतर रात्री १०.३६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.