Adv. M. N. Deshmukh : ॲड. एम. एन. देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात ३५० औषधी वनस्पतींची रोपवाटिका

Adv. M. N. Deshmukh : ॲड. एम. एन. देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात ३५० औषधी वनस्पतींची रोपवाटिका

0

Adv. M. N. Deshmukh : अकोले : सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲड. एम. एन. देशमुख (Adv. M. N. Deshmukh) यांच्या वाढदिवसानिमित्त ॲड्. एम. एन. देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राजूर (ता. अकोले) येथे पर्यावरण संवर्धनाचा (Environmental Conservation) संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आला. निसर्ग संवर्धन विभाग, वनस्पतीशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय छात्रसेना विभागाच्या (NCC) संयुक्त विद्यमाने ३५० औषधी व पर्यावरणपूरक वनस्पतींची रोपवाटिका तयार करण्यात आली.

ही रोपे महाविद्यालय परिसरासह लावून संवर्धन करणार

पर्यावरणप्रेमी राहुल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन, सादडा, बेहडा, आवळा, चंदन यांसह विविध औषधी व स्थानिक वृक्षांची रोपे तयार करण्यात आली. भविष्यात ही रोपे महाविद्यालय परिसरासह विविध ठिकाणी लावून त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी सत्यनिकेतन संस्थेचे सचिव एम. एल. मुठे यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य प्रो. डॉ. बी. वाय. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी वनस्पती शास्त्र विभागप्रमुख प्रा. के. जे. काकडे, निसर्ग संवर्धन विभागप्रमुख प्रा. व्ही. बी. येलमामे, राष्ट्रीय छात्रसेना प्रमुख कॅप्टन आर. सी. मुठे तसेच प्रा. एस. एन. देशमुख उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पर्यावरण संवर्धन कार्यातील महत्त्वपूर्ण पाऊल (Adv. M. N. Deshmukh)

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, जैवविविधता, स्थानिक वृक्षांचे महत्त्व आणि औषधी वनस्पतींबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे. “आजची रोपे म्हणजे उद्याचे वृक्ष आणि उद्याच्या पिढीचा हरित वारसा” या भावनेतून राबविलेला हा उपक्रम महाविद्यालयाच्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्यातील महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.