Tribal Community : आदिवासी समाजाला कोणत्याही शासकीय सेवेपासून वंचित राहू देणार नाही; आमदार अक्षय कर्डिले यांचा शब्द

Tribal Community : आदिवासी समाजाला कोणत्याही शासकीय सेवेपासून वंचित राहू देणार नाही; आमदार अक्षय कर्डिले यांचा शब्द

0
Tribal Community : आदिवासी समाजाला कोणत्याही शासकीय सेवेपासून वंचित राहू देणार नाही; आमदार अक्षय कर्डिले यांचा शब्द
Tribal Community : आदिवासी समाजाला कोणत्याही शासकीय सेवेपासून वंचित राहू देणार नाही; आमदार अक्षय कर्डिले यांचा शब्द

पुढील कार्यक्रमात थेट दाखले वाटप करणार

Tribal Community : अहिल्यानगर : आदिवासी समाजातील (Tribal Community) पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा (Government schemes) थेट लाभ मिळावा, त्यांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांना गती मिळावी, यासाठी आदिवासी विकास विभागाच्या वतीने सेवासंकल्प अभियानांतर्गत ‘सेवासेतू’ कार्यक्रम कापूरवाडी येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात आदिवासी बांधवांशी संवाद साधताना आमदार अक्षय कर्डिले (MLA Akshay Kardile) यांनी आदिवासी समाजाच्या सर्व प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करून ते लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही दिली.

प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी अधिकारी-कर्मचारी उपस्थित

आदिवासी समाज कोणत्याही शासकीय सेवेपासून वंचित राहणार नाही. तुमची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी अधिकारी-कर्मचारी आज कापूरवाडीत तुमच्या सेवेत उपस्थित आहेत. आजपासूनच कामाला सुरुवात होईल. पुढील कार्यक्रम घेताना केवळ माहिती देण्यासाठी नव्हे, तर थेट दाखले वाटप करण्यासाठी येऊ असे स्पष्ट प्रतिपादन आमदार अक्षय कर्डिले यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या कार्यकाळाच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेल्या सेवासंकल्प अभियानाच्या माध्यमातून वंचित घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आदिवासींना वणवण फिरण्याची वेळ येणार नाही (Tribal Community)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आदिवासी समाज हा समाजव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असून, या समाजाने कायमच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून साथ दिली आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांच्या अडचणी सोडविणे ही आपली जबाबदारी आहे. ‘येणाऱ्या काळात आदिवासी समाजाला कोणत्याही गरजेसाठी वणवण फिरण्याची वेळ येऊ देणार नाही. त्यांची सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे असा शब्दही आमदार कर्डिले यांनी दिला. कापूरवाडी परिसरातील आदिवासी बांधवांना स्वतःचे घर मिळेपर्यंत पाठपुरावा थांबणार नाही, असेही आमदार अक्षय कर्डिले यांनी स्पष्ट केले. पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून लवकरात लवकर घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


आदिवासी बांधवांनी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आदिवासी समाजासाठी कायम खंबीरपणे साथ दिल्याची आठवण सांगत, कर्डिले कुटुंबीयांच्या पाठीशी आपण कायम उभे राहू, अशी भावना व्यक्त केली. शिवाजीराव कर्डिले यांनी जपलेले आदिवासी समाजाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते पुढेही कायम ठेवून अक्षय कर्डिले यांच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नांसाठी साथ देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


या कार्यक्रमात शिष्यवृत्ती, वसतिगृह, शबरी आदिवासी घरकुल योजना, वनहक्क अधिनियम, आदिवासी वस्ती सुधारणा, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, सिकलसेल आजार, रोजगार, स्वयंरोजगार, आरोग्य व शिक्षणासह विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रियेबाबतही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

अधिकारी-कर्मचारी थेट गावात; प्रलंबित कामांना आता गती
सेवासेतूच्या माध्यमातून प्रशासन आणि आदिवासी समाज यांच्यात थेट संवाद घडवून आणण्यात आला. त्यामुळे कापूरवाडी परिसरातील नागरिकांनी आपल्या विविध समस्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसमोर मांडल्या. प्रलंबित कामांची माहिती घेऊन ती तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले. यामुळे आदिवासी बांधवांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.