The Lure of Cheap Gold : स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; १६०० ग्रॅम बनावट सोन्याचे दागिने व ११ मोबाईल हस्तगत

The Lure of Cheap Gold : स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; १६०० ग्रॅम बनावट सोन्याचे दागिने व ११ मोबाईल हस्तगत

0

The Lure of Cheap Gold : नगर : अहिल्यानगरमध्ये सोन्याचे आमिष (The Lure of Cheap Gold) दाखवणाऱ्या टोळीने सापळा रचला. एकाला सोन्याचे आमिष दाखवले. त्याच्याकडून आगाऊ रक्कम म्हणून एक लाख रुपयेही घेतले. मात्र, फसवणूक (Fraud) झालेल्या व्यक्तीला संशय आला आणि प्लॅन फसला. पोलिसांनी (Police) टोळीतील तीन जणांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडील १६०० ग्रॅम बनावट सोन्याचे दागिने व ११ मोबाईल हस्तगत करण्यात आले.

आगाऊ रक्कम म्हणून दिले एक लाख रुपये

नवनागापूर येथील सचिन वाघ यांच्या बाबत ही घटना घडली. त्यांना दोन तीन दिवसापूर्वी तीन अनोळखी इसमांनी भेटून घराच्या खोदकामात सोने सापडले असून त्यातील १ किलो सोने स्वस्तात विकायचे आहे असे आरोपींनी सांगितले. त्यानुसार सचिन वाघ यांना त्यांच्यावर विश्वास बसला. त्यांनी आरोपींना एक लाख रुपये आगाऊ रक्कम म्हणून दिले. उर्वरित रक्कम बुधवारी (ता. २३) रात्री ११ वाजता जुने आरटीओ ऑफीस जवळ देणार असल्याचे सांगितले होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिली माहिती (The Lure of Cheap Gold)

मात्र, सचिन वाघ यांना संशय आला. त्यांनी याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले. यात राहुल शंभू सोलंकी (वय २४, रा.रामटेक रेल्वे स्टेशन, शीतलवाडी, रामटेक, ता.जि.नागपूर), नंदू मानसिंग सोलंकी (वय ३६, रा. केकेनगर, पडसोडा, रामटेक, ता.जि.नागपूर) व पूजा राहुल सोलंकी (वय २४, रा.रामटेक रेल्वे स्टेशन, शीतलवाडी, रामटेक, ता.जि.नागपूर) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून १६०० ग्रॅम वजनाचे बनावट सोन्याच्या मण्यांची माळ, ५२ हजार रुपये किंमतीचे ११ मोबाईल, एक हँड बॅग असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.