Drought-like Situation Declared : राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित; संगमनेर तालुक्याचा समावेश

विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सवलत मिळणार

0
Drought-like Situation Declared : राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित; संगमनेर तालुक्याचा समावेश
Drought-like Situation Declared : राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित; संगमनेर तालुक्याचा समावेश

Drought-like Situation Declared : संगमनेर : राज्यात पावसाच्या खंडाने खरीप हंगामातील पिके वाया गेल्यामुळे शेतकरी मोठ्या आसमानी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने (State Government) २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित (Drought-like Situation Declared) केली असून, यामध्ये संगमनेर तालुक्याचाही समावेश करण्यात आला असल्याची माहिती संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ (Amol Khatal) पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  

नक्की वाचा : एसएस रिटेलच्या शेअर्सचा धमाका; दोन दिवसांत पैसे दुप्पट

विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सवलत मिळणार

पुढे बोलताना आमदार खताळ म्हणाले की, ट्रिगर-१ अंतर्गत पंचनाम्यांची प्रक्रिया पार पडणार असून सरसकट पद्धतीने शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जमीन महसुलात सूट देण्यासोबतच शेती कर्जाचे पुनर्गठन आणि कर्ज वसुलीस स्थगिती देण्यात येणार आहे. एचपी पर्यंतचे वीजबिल आधीच माफ करण्यात आले असून, त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या पंपांसाठीही वीजबिलात सवलत दिली जाईल. तसेच शेतकऱ्यांची वीज खंडित केली जाणार नाही. तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सवलत मिळणार आहे.  

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

टँकरद्वारे पाणीपुरवठ्याच्या सूचना (Drought-like Situation Declared)

रोहयो व टँकरद्वारे पाणीपुरवठा: रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये शिथिलता दिली जाईल. ज्या गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे, तिथे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याच्या सूचना आधीच देण्यात आल्या आहेत. पशुधनासाठी चारा व्यवस्था आणि दीर्घकालीन उपायांसाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवली जाणार आहेत. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांची भेट घेऊन संगमनेर तालुक्यात दुष्काळ घोषित करण्याची मागणी केली होती. तसेच कृषी मंत्र्यांनी स्वतः शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली होती. 

शासनाच्या या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, आगामी काळात शेतकरी हिताचे सर्व प्रयत्न केले जातील. तसेच यामध्ये कोणीही राजकारण करू नये असा टोला देखील आमदार अमोल खताळ पाटील यांनी विरोधकांना मारला आहे.