Radhakrishna Vikhe Patil | राहुल गांधी यांची फक्त ‘झूठ की गूंज’ सुरू – राधाकृष्ण विखे पाटील

0

Radhakrishna Vikhe Patil | नगर : “काँग्रेस नेते राहुल गांधी यांची फक्त ‘झूठ की गूंज’ सुरू आहे. सीजेपीच्या आंदोलनातून राजकीय फायदा घेण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न देशातील जनता हाणून पाडेल. एसआयआरप्रकरणाला जाणीवपूर्वक राजकीय वळण दिले जात असून, देशातील जनतेचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आहे आणि भविष्यातही तो कायम राहील,” असे ठाम मत अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

हे वाचा – दुष्काळ जाहीर झाला, आता सरसकट मदत द्या; रोहित पवारांची मागणी

सीजेपीवर टीका ( Radhakrishna Vikhe Patil )

मंत्री विखे पाटील म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या विरोधात सीजेपी आंदोलन करीत असली तरी, ते त्यांचे कामच नाही. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केलेल्या आंदोलनापुरतेच त्यांनी मर्यादित राहायला पाहिजे होते. त्यामुळे कोणतेही मुद्दे घेऊन ते जर राजकारण करीत असतील तर देशातील जनता त्यांना थारा देणार नाही.

“राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने विवाह करावेत, अशी सूचना मी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत करणार असून, या संदर्भात मुख्यमंत्र्यांनाही काही नियमावली करण्याची विनंती करणार आहे. माझ्या मुलाचेही लग्न मी सामूहिक विवाह समारंभात साधेपणाने केले आहे. अनावश्यक खर्च अशा परिस्थितीमध्ये आपण वाचविला पाहिजे. खर्चावर बंधन घालून घेणे ही या संकटात महत्त्वाची बाब आहे,” असे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्यातील धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठ्याचे पुढच्या पावसाळ्यापर्यंत नियोजन करावे लागणार आहे. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून पिण्याच्या पाण्यास प्रथम प्राधान्य आणि त्यानंतर उर्वरित पाणी शेतीसाठी, असा प्राधान्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.

नक्की वाचा : वृद्धाश्रमात चिडविण्याच्या रागातून दोघांचा खून; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तीन महिने चारा पुरेल इतकी उपलब्धता ( Radhakrishna Vikhe Patil )

जनावरांच्या चाऱ्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, चारा उपलब्ध करून देण्यासाठी डीबीटी यंत्रणेचा वापर करावा. पशुधनाची जनगणना झालेली आहे. लम्पी आजारामध्ये जनावरांच्या लसीकरणाचा डेटाही प्रशासनाकडे उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना चाऱ्याचे थेट अनुदान डीबीटीच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते. एक नवी यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध झाली आहे, तिचा उपयोग करून घेतला पाहिजे. चारा छावण्यांच्या बाबतीत यापूर्वीचा अनुभव चांगला नाही. यापूर्वी अनेक आरोप-प्रत्यारोपही झाले. एक अधिवेशन तर चारा छावण्यांमध्ये झालेल्या गैरप्रकारांमुळे गाजले होते, याकडे त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुढील तीन महिने चारा पुरेल इतकी उपलब्धता असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

“उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी मराठवाड्यात जाऊन ५० हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना करण्याच्या वल्गना केल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याचा सोयीस्कर विसर त्यांना पडला. एक रुपयाची मदतसुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना केली नव्हती, याची आठवण त्यांनी ठेवावी,” असा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.

दुष्काळाबाबत विशेष बैठक ( Radhakrishna Vikhe Patil )

“महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील लोणी येथून सहभागी झाले होते. या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी राज्यातील वाढत्या वीज टंचाईच्या बाबतीत शासनाने तातडीने व गांभीर्याने काही ठोस निर्णय घ्यावे लागतील, अशी आग्रही सूचना केली. ग्रामीण भागातील भारनियमनाच्या वाढत्या प्रमाणामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व संवेदनशील वातावरण निर्माण झाले असल्याकडे त्यांनी महसूल मंत्र्यांचे विशेष लक्ष वेधले.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here