Double Murder at Matoshree Old Age Home : मातोश्री वृद्धाश्रमातील दुहेरी हत्याकांडातील आरोपी जेरबंद ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई; आठ जणांवर काठीने हल्ला, दोघांचा मृत्यू

Double Murder at Matoshree Old Age Home : मातोश्री वृद्धाश्रमातील दुहेरी हत्याकांडातील आरोपी जेरबंद ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई; आठ जणांवर काठीने हल्ला, दोघांचा मृत्यू

0

Double Murder at Matoshree Old Age Home : नगर : विळदघाट येथील मातोश्री वृद्धाश्रमात आठ वृद्धांवर काठीने हल्ला (Double Murder at Matoshree Old Age Home) करून त्यातील दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police Station) तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली. राजू तुकाराम घुले (वय ५४, रा. मातोश्री वृद्धाश्रम, विळदघाट, अहिल्यानगर) असे अटक (Arrested) केलेल्या आरोपीचे नाव आहे.

चेष्ठेच्या कारणावरून रहिवाशांवर हल्ला

याबाबत माहिती अशी की, २६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे सहा वाजता ही घटना घडली. वृद्धाश्रमात राहणारे काही जण आपली चेष्टा करतात, या कारणावरून राजू घुले याने वृद्धाश्रमातील रहिवाशांवर हल्ला केला. वृद्धांना चालण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या, वरच्या बाजूला प्लास्टिकचा दांडा आणि खालच्या बाजूला लोखंडी भाग असलेल्या काठीने त्याने आठ जणांना मारहाण केली. या हल्ल्यात संतोष भिवराज पिरंगळ, लिंबराज दामोदर फिसके, साहेबराव दगडू भवर, बाळासाहेब आंबादास घाडगे, गोरख हरीभाऊ फुंदे, गणेश छंबू घोडके, दत्तात्रय शंकर हारके आणि मंकाळेश्वर बाबुराव हेने हे जखमी झाले. त्यापैकी दत्तात्रय शंकर हारके आणि मंकाळेश्वर बाबुराव हेने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आरोपी राजू घुलेला तात्काळ अटक (Double Murder at Matoshree Old Age Home)

या प्रकरणी वृद्धाश्रमाचे फिर्यादी दिलीप मांगीलाल चोरडीया यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर पोलिसांनी आरोपी राजू घुले याला तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिवाजी थोरात करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि नगर ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस उपनिरीक्षक अजय कौटे, पोलीस उपनिरीक्षक खिळदकर, सहायक फौजदार राकेश खेडकर यांच्यासह पोलीस हवालदार दादासाहेब नरोटे, बापू फोलाणे, शैलेश रोहोकले, राजू सुद्रीक, देविदास खेडकर, पोलीस नाईक गणेश पालवे, दीपक फुंदे, सूरज देशमुख, नवनाथ दहिफळे, किशोर जाधव, गोरख केदार, संपत खेडकर, सचिन हरदास आणि सुधीर गवारे यांच्या पथकाने केली आहे.