Manoj Jarange : ‘आंदोलनाच्या नावाखाली मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची दिशाभूल केली’; नवनाथ वाघमारे यांचा गौप्यस्फोट

0
Manoj Jarange : 'आंदोलनाच्या नावाखाली मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची दिशाभूल केली'; नवनाथ वाघमारे यांचा गौप्यस्फोट

नगर :  मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. आंदोलन करण्यासाठी ते मुंबईच्या दिशेनं निघाले देखील होते. मात्र वाटेतच प्रकृती बिघडल्यामुळे अखेर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतल्यानंतर जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. त्यानंतर आता आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला तीन महिन्यांचा वेळ आपण दिला असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील केला. यावर बोलताना आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे (OBC leader Navnath Waghmare) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नक्की वाचा : निकषांत न बसणाऱ्या तालुक्यांनाही मिळणार मदत; राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

जरांगे यांच्याकडून मराठा समाजाची दिशाभूल सुरू (Manoj Jarange)

नवनाथ वाघमारे म्हणाले की, सरकारने जरांगे यांना मागण्यांची पूर्तता करण्यासाठी एक वर्षाची मुदत दिली आहे, पण ३ महिन्याची मुदत असल्याचं सांगत जरांगे यांच्याकडून मराठा समाजाची दिशाभूल सुरू आहे, असा मोठा गौप्यस्फोट यावेळी नवनाथ वाघमारे यांच्याकडून करण्यात आला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जरांगे यांनी माफिया पोसले, मोठे केले. पोलीस पोत्यात घालून मारणार असल्याचे लक्षात आल्यानंतर जरांगे पाटोद्यातून पळून आले. जरांगे सर्वात मोठे नौटंकीबाज आहेत. नौटंकी करण्यासाठीच जरांगे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. जरांगेनी मराठा समाजाची आरक्षणाच्या नावाखाली फसवणूक केली आहे. त्यांनी राजकारणी लोकांकडून रसद घेऊन आंदोलन केले, असे अनेक गंभीर आरोप देखील यावेळी वाघमारे यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांच्यावर करण्यात आले आहेत.

अवश्य वाचा : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर एसीबीचा छापा; १३ कोटींची बेहिशेबी संपत्ती सापडली

‘मनोज जरांगे पाटील यांच्या आसपास फक्त माफियांची टोळी उरली‘ (Manoj Jarange)

माता माऊल्यांना किती ट्रोल करायचं हे जरांगे यांच्या पिलावळींना कळायला पाहिजे, महिलांना गलिच्छ बोलणारे शिवरायांचे मावळे कसे असू शकतात? आता मनोज जरांगे पाटील यांच्या आसपास फक्त माफियांची टोळी उरली आहे. ललिता तारख यांना ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. जरांगेंच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांनी डिफेंडर गाडी परत केली, असंही यावेळी नवनाथ वाघमारे यांनी म्हटलं आहे.