
District Central Bank : नगर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (District Central Bank) संचालक मंडळ निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी पाच उमेदवारी अर्ज (Candidature Application) दाखल झाले असून तिसऱ्या दिवसा अखेर एकूण नऊ जणांचे उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. तर तिसऱ्या दिवसाखेर विक्री झालेल्या उमेदवारी अर्जांची संख्या 680 झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे (Mangesh Survase) यांनी दिली.
नक्की वाचा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राम शिंदेंनी कसली कंबर; कोणाचा जाणार राजकीय बळी?
यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल
आज (ता. 30) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीचा तिसरा दिवस होता. तिसऱ्या दिवशी बिगर शेती मतदार संघासाठी प्रशांत सबाजीराव गायकवाड आणि संजयकुमार मोतीलाल कर्नावट (पारनेर) या दोन दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. महिला राखीव मतदार संघासाठी चंदा गंगाधर गर्जे (पाथर्डी) यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. तर इतर मागास राखीव मतदार संघासाठी प्रशांत सबाजीराव गायकवाड (पारनेर) आणि आजिनाथ रामभाऊ हजारे (जामखेड) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तिसऱ्या दिवसा अखेर एकूण नऊ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
एकुण 680 अर्जांची विक्री (District Central Bank)
तिसऱ्या दिवशी 149 उमेदवारी अर्जांची विक्री झाली. त्यामुळे तिसऱ्या दिवसाअखेर विक्री झालेल्या उमेदवारी अर्जांची संख्या एकुण 680 झाली आहे. तिसऱ्या दिवशी उमेदवारी अर्ज नेलेल्या प्रमुख व्यक्तींमध्ये महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, खासदार निलेश लंके, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ, जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे यांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवार दि. 1 ऑक्टोबर, शनिवार दि.3 ऑक्टोबर आणि सोमवार दि.5 ऑक्टोबर ऑक्टोबर असे अवघे तीन दिवसाची मुदत राहिली आहे. या अखेरच्या तीन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या घडामोडी कडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


