Illegal liquor seized : सोनईत 10 लाख 88 हजारांची अवैध दारू जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Illegal liquor seized : सोनईत 10 लाख 88 हजारांची अवैध दारू जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Illegal liquor seized : सोनईत 10 लाख 88 हजारांची अवैध दारू जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Illegal liquor seized : नगर : दादर आणि नगर हवेली, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशातून महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेली विदेशी दारू (Foreign Liquor) आणून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) कारवाई केली. सोनई पोलीस ठाण्याच्या (Sonai Police Station) हद्दीत केलेल्या या कारवाईत 10 लाख 88 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये विदेशी दारूसह कारचा समावेश आहे.

नक्की वाचा : जिल्हा बँकेसाठी एकूण नऊ उमेदवारी अर्ज दाखल; तिसऱ्या दिवशी 149 अर्जांची विक्री

10 लाख रुपये किमतीची कार जप्त

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 29 सप्टेंबर रोजी सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांबाबत माहिती घेत असताना त्यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चांदा (ता. नेवासा) येथे कारवाई केली. संभाजी कचरू गायकवाड यांच्या घरासमोर उभी असलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारची पंचांसमक्ष झडती घेण्यात आली.झडतीमध्ये रॉयल स्टॅग कंपनीच्या 180 मिलीच्या 624 बाटल्या, किंमत 56 हजार 160 रुपये, तसेच इंपीरियल ब्लू कंपनीच्या 480 मिलीच्या 384 बाटल्या, किंमत 32 हजार 640 रुपये, असा एकूण 88 हजार 800 रुपयांचा विदेशी दारूसाठा आढळून आला. याशिवाय 10 लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Illegal liquor seized)

या प्रकरणी पोलिसांनी संभाजी कचरू गायकवाड यांच्याकडे चौकशी केली असता, प्रविण नानासाहेब धाडगे, राजेंद्र बापुराव जावळे आणि संदिप शिवाजी गायकवाड (सर्व रा. चांदा, ता. नेवासा) यांनी हा दारूसाठा विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी संबंधितांचा शोध घेतला; मात्र ते मिळून आले नाहीत. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड तसेच पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, विकास साळवे, अमृत आढाव आणि बाळासाहेब गुंजाळ यांच्या पथकाने केली.