Suicide : प्रेमी युगुलाने गळफास घेत संपवले जीवन; श्रीगोंदा तालुक्यातील वेळू येथील घटना

गीता ही विवाहीत तर विकास हा अविवाहित असल्याचे समोर

0
Suicide : प्रेमी युगुलाने गळफास घेत संपवले जीवन; श्रीगोंदा तालुक्यातील वेळू येथील घटना
Suicide : प्रेमी युगुलाने गळफास घेत संपवले जीवन; श्रीगोंदा तालुक्यातील वेळू येथील घटना

Suicide : श्रीगोंदा : तालुक्यातील वेळू शिवारात एकाच झाडाला (Tree) तरुण-तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची (Suicide) हृदयद्रावक घटना आज (ता. ३०) सकाळी उघडकीस आली. विकास राजू आखाडे आणि गीता अनिल मसाने (वय २२ वर्षे, दोघे रा. जळगाव जामोद, ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा) अशी गळफास घेतलेल्यांची नावे आहेत. प्राथमिक तपासात (Preliminary investigation) प्रेमसंबंधातून ही टोकाची भूमिका घेतल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

नक्की वाचा : सोनईत 10 लाख 88 हजारांची अवैध दारू जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

एकाच झाडाला घेतला दोघांनी गळफास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास आणि गीता हे दोघे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील रहिवासी असून, गेल्या दोन दिवसांपूर्वीच ते वेळू येथील शेतकरी नागनाथ पिंपळे यांच्याकडे शेतमजुरीच्या कामासाठी आले होते. त्यांची राहण्याची व्यवस्था शेतातील शिवारातच करण्यात आली होती. मंगळवारी (ता. २९) सकाळी शेतात कामासाठी गेलेल्या इतर मजुरांना दोघे एकाच झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

गीता ही विवाहीत तर विकास हा अविवाहित असल्याचे समोर (Suicide)

या घटनेची माहिती मिळताच शेतमालकाने तातडीने श्रीगोंदा पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. पोलीस तपासात मयत गीता हिचा यापूर्वीच विवाह झाला असल्याचे, तर विकास हा अविवाहित असल्याचे समोर आले आहे. तसेच, यापूर्वीही हे दोघे घरातून निघून गेल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसले, तरी प्रेमसंबंधातून त्यांनी हे टोकदार पाऊल उचलल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे करत आहेत.