Kotwali police : माळीवाड्यात भरदिवसा महिलेची पर्स लांबवली; २४ तासांत कोतवाली पोलिसांनी तिघे घेतले ताब्यात

दोन जण दुचकीवरून पर्स घेऊन पसार

0
Kotwali police : माळीवाड्यात भरदिवसा महिलेची पर्स लांबवली; २४ तासांत कोतवाली पोलिसांनी तिघे घेतले ताब्यात
Kotwali police : माळीवाड्यात भरदिवसा महिलेची पर्स लांबवली; २४ तासांत कोतवाली पोलिसांनी तिघे घेतले ताब्यात

Kotwali police : नगर : माळीवाडा परिसरात भरदिवसा फुलविक्री (Flower Sales) करणाऱ्या महिलेची पर्स व त्यातील ३० हजार रुपयांची रोकड चोरून पसार झालेल्या तिघांना कोतवाली पोलिसांनी (Kotwali police) अवघ्या २४ तासांत ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेली पर्स, ३० हजार रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. निखील सुनिल उल्हारे (१९), अनिकेत गोवर्धन पवार (२०) आणि यशोदास राजू शिंदे (२२), अशी असून ते तिघेही (देवी मंदिराच्या मागे, रामवाडी, अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे (The accused) नाव आहे.

नक्की वाचा : प्रेमी युगुलाने गळफास घेत संपवले जीवन; श्रीगोंदा तालुक्यातील वेळू येथील घटना

घटनास्थळी जाऊन माहिती संकलित

ही घटना २८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास माळीवाडा येथील श्री दत्त फ्लॉवर डेकोरेटर दुकानाजवळ, श्री विशाल गणपती मंदिर परिसरात घडली. अलका दत्तात्रय भुतारे या फुलविक्री करीत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांची पर्स चोरून नेली. पर्समध्ये ३० हजार रुपयांची रोकड होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने घटनास्थळी जाऊन माहिती संकलित केली. गुप्त माहितीदारांकडून मिळालेली माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपासाला गती दिली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

दोन जण दुचकीवरून पर्स घेऊन पसार (Kotwali police)

तपासादरम्यान चोरी करणारा आरोपी आणि त्याच्यासोबत असलेले आणखी दोन जण हे दुचकीवरून पर्स घेऊन पसार झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी संशयितांचा शोध घेऊन तिघांना २४ तासांच्या आत ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे निखील सुनिल उल्हारे (१९), अनिकेत गोवर्धन पवार (२०) आणि यशोदास राजू शिंदे (२२), अशी असून ते तिघेही देवी मंदिराच्या मागे, रामवाडी, अहिल्यानगर येथे राहतात. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून चोरीस गेलेली पर्स, त्यातील ३० हजार रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड पोलिसांनी हस्तगत केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मपोना वर्षा पंडित करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोली स अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि नगर शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील विशाल दळवी, विनोद बोरगे, सूर्यकांत डाके, राहुल शिंदे, वर्षा पंडित, सुरज कदम, संकेत धिवर, अतुल लाटे, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, सचिन लोळगे, रमेश शिंदे, वैभव काळे, चालक संदीप शेंडगे तसेच दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडु आणि अरुण सांगळे यांच्या पथकाने केली आहे.