District Bank Election : नगर : जिल्हा बँक निवडणूक (District Bank Election) बिनविरोध व्हावी यासाठी संगमनेर येथे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली मात्र या बैठकीला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तसेच खासदार निलेश लंके हे अनुपस्थित होते यावरून तर्क वितर्क लावले जाऊ लागले दरम्यान आता यावरती बोलताना अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
नक्की वाचा : माळीवाड्यात भरदिवसा महिलेची पर्स लांबवली; २४ तासांत कोतवाली पोलिसांनी तिघे घेतले ताब्यात
बहुतांश नेते बैठकीला उपस्थित
आमदार जगताप बोलताना म्हणाले की त्या बैठकीला बहुतांश नेते उपस्थित होते. जे तालुकास्तरावर या निवडणुकीत भाग घेणारे नेते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. बहुतांश लोकांना निरोप दिलेला होता मात्र, या बैठकीला आमदार मोनिका राजळे, चंद्रशेखर घुले ही नव्हते मात्र त्यांच्याशी देखील सुजय विखे हे बोलणार होते तसेच काहीशी बाळासाहेब थोरात हे देखील बोलणार होते मात्र बैठक अचानक ठरली असल्याने सगळेजण उपस्थित राहू शकले नाही. जरी बैठकीला उपस्थित नसल्या तरी फोन द्वारे त्यांच्याशी संवाद झाला असेल. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की निवडणुकीतील जागा वाटपाबाबत शेवटच्या क्षणापर्यंत ही प्रक्रिया सुरू असते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
जागा वाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही (District Bank Election)
जागा वाटप बाबत अद्याप पर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही मात्र बँक ही बिनविरोध झाली पाहिजे या निर्णयापर्यंत हे बहुतांश नेते पोहोचलेले आहेत. दरम्यान पूर्वी ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे स्थान होते जेवढे प्रतिनिधी राष्ट्रवादीचे होते तेवढेच प्रतिनिधी राहतील यासाठी आमच्या सर्वांचे प्रयत्न आहे. ज्या पद्धतीने या निवडणुकींवरती पूर्वी दिवंगत नेते अजित पवार यांचे लक्ष होते त्याच पद्धतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे लक्ष असणार आहे. व सर्वांचे स्थान अबाधित राहील असाच निर्णय होईल, असे महत्त्वाचे प्रतिक्रिया यावेळी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दिली.



