Mega Cleanliness Drive : सेवा ही स्वच्छता! महास्वच्छता अभियानात ४९५ श्री सदस्यांचा सहभाग; १२ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता

आयुक्त यशवंत डांगे यांनी स्वतःची गाडी थांबवून श्री सदस्यांना बसविले गाडीत

0
Mega Cleanliness Drive : सेवा ही स्वच्छता! महास्वच्छता अभियानात ४९५ श्री सदस्यांचा सहभाग; १२ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता
Mega Cleanliness Drive : सेवा ही स्वच्छता! महास्वच्छता अभियानात ४९५ श्री सदस्यांचा सहभाग; १२ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता

Mega Cleanliness Drive : नगर : महात्मा गांधी जयंतीच्या (Mahatma Gandhi Jayanti) आदल्या दिवशी अहिल्यानगर शहरात अहिल्यानगर महानगरपालिकेच्या (Ahilyanagar Municipal Corporation) सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महास्वच्छता अभियानात (Mega Cleanliness Drive) ४९५ श्री सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सुमारे १२ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता केली. या मोहिमेत तब्बल ९६०० किलो कचरा उचलण्यात आला. विशेष म्हणजे, मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी स्वतः या स्वच्छता अभियानात सहभागी होत शहरातील विविध ठिकाणी जाऊन श्री सदस्यांसोबत कचरा उचलला.

नक्की वाचा : जिल्हा बँके संदर्भात आमदार संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया आली समोर

Mega Cleanliness Drive : सेवा ही स्वच्छता! महास्वच्छता अभियानात ४९५ श्री सदस्यांचा सहभाग; १२ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता
Mega Cleanliness Drive : सेवा ही स्वच्छता! महास्वच्छता अभियानात ४९५ श्री सदस्यांचा सहभाग; १२ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता

व्यापक जनजागृती करण्याची गरज

अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य कोणत्याही आदेशाची वाट न पाहता स्वतःहून स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. शहरातील विविध भागांमध्ये रस्ते, परिसर आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की, नागरिकांची मानसिकता बदलणे आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. अनेक नागरिक स्वतःचे घर स्वच्छ ठेवतात; मात्र घराबाहेरील परिसर अस्वच्छ ठेवतात. हातातील कचऱ्याची पिशवी रस्त्यावर, नदी-नाल्यांमध्ये आणून टाकल्याने परिसर अस्वच्छ होतो. पुणे आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करून त्याची विल्हेवाट लावतात. आपल्या शहरातही अशा पद्धतीला चालना देण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

Mega Cleanliness Drive : सेवा ही स्वच्छता! महास्वच्छता अभियानात ४९५ श्री सदस्यांचा सहभाग; १२ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता
Mega Cleanliness Drive : सेवा ही स्वच्छता! महास्वच्छता अभियानात ४९५ श्री सदस्यांचा सहभाग; १२ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता

प्रत्येक व्यक्तीने स्वच्छतेबाबत पुढाकार घ्यावा (Mega Cleanliness Drive)

रस्त्यावर कचरा आणून टाकणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली पाहिजे. शहरात पोलिसांनी बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक ठिकाणी बंद असले तरी व्यावसायिक तसेच नागरिकांच्या घरांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेऊन प्रशासनाने कारवाई करावी, अशी अपेक्षाही जगताप यांनी व्यक्त केली.समाजामध्ये काळानुसार बदल होणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वच्छतेबाबत पुढाकार घेऊन स्वयंशिस्त लावून घेणे गरजेचे आहे. पहिलीच्या विद्यार्थ्यांपासूनच सामाजिक कार्य आणि स्वच्छतेची माहिती देऊन जनजागृती करावी. आपण खाल्लेल्या चॉकलेटचा कागद रस्त्यावर न टाकता कचरापेटीतच टाकावा, अशी सवय लहान मुलांमध्ये रुजविण्याची गरज आहे. संत गाडगेबाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून गावोगावी फिरून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले, तरीही नागरिकांमध्ये अपेक्षित बदल झालेला नाही. आपण अजूनही मागे का आहोत, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून स्वयंशिस्त लावली पाहिजे. कचरा उचलण्यासाठी बाहेरून कोणीही येणार नाही; मात्र महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्य स्वतःहून शहरात येऊन स्वच्छता करत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. त्यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत. शहरात घंटागाडी फिरत असून नागरिकांनी आपला कचरा घंटागाडीतच टाकावा. घंटागाडीत कचरा न टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. स्वच्छतेबाबत लोकचळवळ उभी करून अहिल्यानगर शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन जगताप यांनी केले.

Mega Cleanliness Drive : सेवा ही स्वच्छता! महास्वच्छता अभियानात ४९५ श्री सदस्यांचा सहभाग; १२ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता
Mega Cleanliness Drive : सेवा ही स्वच्छता! महास्वच्छता अभियानात ४९५ श्री सदस्यांचा सहभाग; १२ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता

ज्योती गाडे म्हणाल्या की

महापौर ज्योती गाडे म्हणाल्या की, स्वच्छतेमध्ये देव आहे. संत गाडगेबाबांनी गावोगावी फिरून हातात झाडू घेत स्वच्छतेचे महत्त्व समाजाला पटवून दिले. त्यांनी दिलेला हा विचार पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि आज श्री सदस्य तेच काम करत आहेत.स्वच्छतेची जबाबदारी केवळ शासन किंवा प्रशासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे. आपले घर, परिसर, शहर आणि देश स्वच्छ राहण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. स्वच्छता ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असे महापौर ज्योतीताई गाडे यांनी सांगितले.आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, गांधी जयंतीनिमित्त सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘स्वच्छता हीच सेवा’ समजून प्रत्येकाने आपल्या परिसरासाठी एक दिवस, एक तास स्वच्छतेसाठी द्यावा. अहिल्यानगर महापालिकेच्या माध्यमातून वर्षभरात पाच स्वच्छता मोहिमा शहरात राबविण्यात आल्या आहेत.

Mega Cleanliness Drive : सेवा ही स्वच्छता! महास्वच्छता अभियानात ४९५ श्री सदस्यांचा सहभाग; १२ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता
Mega Cleanliness Drive : सेवा ही स्वच्छता! महास्वच्छता अभियानात ४९५ श्री सदस्यांचा सहभाग; १२ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता

श्री सदस्यांना एका फोनवरून आवाहन

महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांना एका फोनवरून आवाहन करण्यात आले आणि त्यांनी कोणत्याही आदेशाची वाट न पाहता शहरात स्वच्छतेला सुरुवात केली. संत महंतांचे थोर सामाजिक कार्य त्यांचे विचार समाजापर्यंत घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्वांना करावे लागणार आहे त्यांचे अनुकरण. श्री सदस्यांनी स्वतःचे साहित्य आणून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने शहरात स्वच्छतेचे काम केले, असे डांगे यांनी सांगितले.प्रतिष्ठानचे प्रफुल्ल काळे म्हणाले की, सकाळी सात वाजता ४९५ श्री सदस्यांनी कोणाचीही वाट न पाहता ठरवून दिलेल्या भागांमध्ये जाऊन स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. या अभियानातून सुमारे १२ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली आणि ९६०० किलो कचरा उचलण्यात आला.आम्ही कधीही फोटो किंवा प्रसिद्धीसाठी काम करत नाही. एका आदेशावर सामाजिक कार्याला महत्त्व देत महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे विचार आत्मसात करून सामाजिक कर्तव्य पार पाडत असतो, असे प्रफुल्ल काळे यांनी सांगितले.

Mega Cleanliness Drive : सेवा ही स्वच्छता! महास्वच्छता अभियानात ४९५ श्री सदस्यांचा सहभाग; १२ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता
Mega Cleanliness Drive : सेवा ही स्वच्छता! महास्वच्छता अभियानात ४९५ श्री सदस्यांचा सहभाग; १२ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता

या महास्वच्छता अभियानावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, आयुक्त यशवंत डांगे, माजी नगरसेवक चाचा तनपुरे, स्वच्छता दूत सुरेश खामकर, डॉ. अमोल बागुल, शिवाजी कुमटकर, सुनील कटारिया, राजेश परदेशी, प्रभाकर बोगा, नीलम परदेशी, घनकचरा विभाग प्रमुख प्रशांत रामदिन यांच्यासह मनपा अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छता सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(चौकट) महास्वच्छता अभियानात आयुक्त यशवंत डांगे यांनी स्वतःहून श्री सदस्यांसोबत शहरातील विविध ठिकाणी जाऊन स्वच्छता केली आणि कचरा उचलला. आयुक्तांसारख्या पदावर असलेली व्यक्ती स्वतः कचरा उचलून स्वच्छता करत असल्याचे पाहून श्री सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले. स्वच्छता मोहीम संपल्यानंतर श्री सदस्य पायी चालत असताना आयुक्त यशवंत डांगे यांनी स्वतःची गाडी थांबवून श्री सदस्यांना गाडीत बसविले आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन गेले. त्यांच्या या कृतीतून स्वच्छतेसोबतच स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती आणि सामाजिक कार्य करणाऱ्या श्री सदस्यांप्रती असलेला सन्मान अधोरेखित झाला.