Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कर्जमाफीचा तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

0
Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कर्जमाफीचा तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

नगर : राज्यात सध्या दुष्काळ जाहीर (Drought Declared) करण्यात आला आहे. सुरुवातीला काही तालुके दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून वगळण्यात आले होते. मात्र आता वगळलेल्या तालुक्यांचाही दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलंय. शेतकऱ्यांच्या मुलांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. पंचनामे सुरू झाले आहेत. असे असतानाच आता शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कर्जमाफीचा तिसरा हप्ता (Farmer Loan Waiver) वितरित करण्यात आला आहे.

नक्की वाचा : ‘आंदोलनाच्या नावाखाली मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची दिशाभूल केली’; नवनाथ वाघमारे यांचा गौप्यस्फोट

नेमका काय निर्णय घेण्यात आला? (Farmer Loan Waiver)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ बाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीचा तिसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे. या तिसऱ्या हप्त्यामध्ये ३.२७ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर ३१६१ कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण १५.८६ लाख कर्जखात्यावर १३,२७६ कोटी रुपये लाभ राज्य सरकारने वितरित केला आहे.

अवश्य वाचा : ‘आंदोलनाच्या नावाखाली मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची दिशाभूल केली’; नवनाथ वाघमारे यांचा गौप्यस्फोट

बँकेच्या व्याजदरामुळे हफ्ता रखडला (Farmer Loan Waiver)

बँकांनी लावलेल्या जास्त व्याजदरामुळे हा हप्ता काही काळ रखडला होता. मात्र, आता हा तिढा सुटला आहे. हजारो शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांना आर्थिक दिलासा देण्याचा हा प्रयत्न राज्य शासनाकडून सातत्याने सुरू आहे. या योजनेमुळे राज्यातील शेतीत सक्षमीकरण होण्यास मदत होईल. कर्जमाफीच्या या टप्प्याने शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याची आशा आहे.