Dr. Radhakrishna Vikhe Patil : नियम आणि कायद्याची अडचण सांगून शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवू नका : डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

जलजीवन मिशनच्या योजनाबाबत प्रशासनाने अधिक गांभीर्याने काम करण्यची गरज

0
Dr. Radhakrishna Vikhe Patil : नियम आणि कायद्याची अडचण सांगून शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवू नका : डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
Dr. Radhakrishna Vikhe Patil : नियम आणि कायद्याची अडचण सांगून शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवू नका : डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

Dr. Radhakrishna Vikhe Patil : नगर : टंचाई परीस्थीतीला (Scarcity situation) सामोरे जाताना प्रशासकीय यंत्रणेने अतिशय संवेदनशीलपणे काम करावे. कोणताही नियम आणि कायद्याची अडचण सांगून शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवू नका.शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून जामखेड तालुका दुष्काळमुक्त (Drought-free) करण्यासाठी जलसंपदा विभागाने महत्वपूर्ण निर्णयांची कार्यवाही सुरू केली आहे. कुकडी धरण समूहातील पाण्याचा लाभ आवर्तनाच्या माध्यमातून देण्याबाबत निश्चित विचार करण्याची ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Dr. Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली.मंत्री विखे पाटील यांनी जामखेड तालुक्यातील दुष्काळी परीस्थीतीचा आढावा घेतला.आरणगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेती पीकांची पाहाणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.

नक्की वाचा : सेवा ही स्वच्छता! महास्वच्छता अभियानात ४९५ श्री सदस्यांचा सहभाग; १२ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता

Dr. Radhakrishna Vikhe Patil : नियम आणि कायद्याची अडचण सांगून शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवू नका : डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
Dr. Radhakrishna Vikhe Patil : नियम आणि कायद्याची अडचण सांगून शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवू नका : डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

एकत्रित नियोजन करण्याच्या सूचना

कर्जत जामखेड तालुक्यातील दुष्काळी भागातील प्रश्न समजावून घेण्यासाठी आढावा बैठक सभापती प्रा राम शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. आमदार सुनिल कर्जतकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नगराध्यक्षा प्रांजली चिंतामणी, अतिरीक्त जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे, अधिक्षक अभियंता अलका अहीरराव, वीज कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, वितरण कंपनीचे रमेश पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी दशरथ दिघे, प्रांताधिकारी नितीन पाटील, विनायक देशमुख, अंबादास पिसाळ, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगतीने निर्णय केले. पाणी राखून ठेवतानाच जनावारांसाठी चारा व पाण्याचे नियोजन प्राधान्य आहे.तालुक्यात चारा उत्पादन होण्यासाठी पशुसंवर्धन आणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित नियोजन करण्याच्या सूचना केल्या.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

Dr. Radhakrishna Vikhe Patil : नियम आणि कायद्याची अडचण सांगून शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवू नका : डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
Dr. Radhakrishna Vikhe Patil : नियम आणि कायद्याची अडचण सांगून शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवू नका : डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित (Dr. Radhakrishna Vikhe Patil)

पंचनामे सर्वाचे होतील. मदतीपासून कोणी वंचित राहाणार नाही असे स्पष्ट करून टॅकर नियोजन करण्यासाठी ग्रामसेवक तलाठी यांनी उपस्थित राहाणे सक्तीचे करावे. परीस्थीती गंभीर असल्याने प्रत्येक विभागाचे अधिकारी, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून काम करावे. खोटी माहीती बैठकीत देवू नये.अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे लोकांमध्ये रोष निर्माण होवू देवू नका.कारवाई करण्यास भाग पाडू नका असा इशारा मंत्री विखे पाटील यांनी दिला.अतिवृष्टीमुळे नूकसान झालेल्या कवडगाव चौंडी जवळा या कोल्हापूर बंधार्याची काम,मोहरी तलावाचा सांडवा,तसेच कुकडी कालव्यांची अतिवृष्टीमुळे झालेल्या नूकसानग्रस्त भागाच्या दुरूस्तीसाठी निधीची उपलब्धता जलसंपदा विभागाने करून दिली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

सभापती राम शिंदे यांंनी तालुक्यातील प्रश्नाचा आढावा घेवुन,कृष्णा खोर्यातील अतिरीक्त पाणी जामखेड तालुक्याला मिळावे आशी अपेक्षा व्यक्त केली.शासनाने दुष्काळी परीस्थीतीतीला सामोरे जाण्यासाठी सर्व निर्णय केले आहेत. प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी अधिकार्यांची आहे.कोणाला खूष करण्यासाठी चुकीची माहीती देवू नका. पीक विमा, वीज प्रश्न, जलजीवन मिशनच्या योजनाबाबत प्रशासनाने अधिक गांभीर्याने काम करण्यची गरज सभापती राम शिंदे यानी व्यक्त केली.याप्रसंगी आ.सुनिल कर्जतकर यांनी सूचना केल्या.