Fraud : भाजपच्या माजी नगरसेवकासह तिघांवर ५७ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; पाथर्डीतील घटना

कागदपत्र बनावट असल्याचा आरोप

0
Fraud : भाजपच्या माजी नगरसेवकासह तिघांवर ५७ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; पाथर्डीतील घटना
Fraud : भाजपच्या माजी नगरसेवकासह तिघांवर ५७ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; पाथर्डीतील घटना

Fraud : पाथर्डी : हॉस्पिटल सुरू करण्याचे आमिष दाखवून मेडिकल व लॅब सुरू करण्यासाठी विविध व्यक्तींकडून धनादेश, आरटीजीएस व रोख स्वरूपात तब्बल ५७ लाख रुपये घेतल्याचा आरोप करत डॉक्टरसह चौघांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) डॉ. वसंत गंगाधर अनेराये, त्यांच्या पत्नी ऋतुजा वसंत अनेराये आणि भाजपचे (BJP) माजी नगरसेवक अनिल गोरख बोरुडे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : नियम आणि कायद्याची अडचण सांगून शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवू नका : डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

धनादेश बाऊन्स झाल्याचा आरोप

फिर्यादी डॉ. प्रताप सुभाष वाघ (वय ४६, रा. तिसगाव) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी २०२४ मध्ये अनिल बोरुडे यांच्या पाथर्डी येथील कॉम्प्लेक्समध्ये डॉ. वसंत अनेराये यांच्याशी त्यांची भेट झाली. अनेराये हे या ठिकाणी नवीन हॉस्पिटल सुरू करणार असल्याचे सांगून हॉस्पिटललगत मेडिकल सुरू करण्यासाठी ३० लाख रुपये देण्यास सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.त्यानुसार डॉ. वाघ व प्रसाद लवांडे यांनी मिळून ३० लाख रुपये अनेराये दाम्पत्याला दिल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, हॉस्पिटल सुरू झाले नाही. त्यानंतर ३० लाखांपैकी पाच लाख रुपये परत करण्यात आले; उर्वरित २५ लाख रुपयांचे धनादेश दिले असता ते बाऊन्स झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कागदपत्र बनावट असल्याचा आरोप (Fraud)

याचप्रमाणे पांडुरंग काकडे यांच्याकडून रक्त-लघवी तपासणीची लॅब सुरू करण्यासाठी ८ लाख रुपये, शुभम परदेशी यांच्याकडून मेडिकल सुरू करण्यासाठी २० लाख रुपये, तर अमोल फुंदे यांच्याकडून लॅब सुरू करण्यासाठी ८ लाख रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. संबंधित व्यवहारांनंतर हॉस्पिटल सुरू न झाल्याने पैसे परत मागण्यात आले. काही रक्कम परत करण्यात आली; मात्र उर्वरित रकमेसाठी दिलेले धनादेश बाऊन्स झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हॉस्पिटलच्या नोंदणीचे प्रमाणपत्र म्हणून पाठविण्यात आलेले कागदपत्रही बनावट असल्याचे लक्षात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या सर्व व्यवहारांमध्ये डॉ. वसंत अनेराये, त्यांच्या पत्नी ऋतुजा अनेराये आणि अनिल बोरुडे यांनी संगनमत करून विश्वास संपादन करून पैसे घेतल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, फिर्यादीतील आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.