Grandparents’ Day : आजी-आजोबा दिन उत्साहात; जुन्या आठवणींना मिळाला उजाळा

Grandparents' Day : आजी-आजोबा दिन उत्साहात; जुन्या आठवणींना मिळाला उजाळा

0
Grandparents' Day : आजी-आजोबा दिन उत्साहात; जुन्या आठवणींना मिळाला उजाळा
Grandparents' Day : आजी-आजोबा दिन उत्साहात; जुन्या आठवणींना मिळाला उजाळा

Grandparents’ Day : अकोले : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडेवाडी येथे आजी-आजोबा दिन (Grandparents’ Day) उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या जीवनात आजी-आजोबांचे महत्त्व, त्यांच्या अनुभवातून मिळणारे संस्कार तसेच कुटुंबातील पिढ्यांमधील स्नेह वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

आजी-आजोबांचे स्वागत करून प्रेम व आदर व्यक्त

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांचे शाळेत स्वागत करून त्यांच्याप्रती प्रेम व आदर व्यक्त केला. आजी-आजोबांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत बालपणीच्या आठवणी, जुन्या काळातील जीवनशैली, पारंपरिक खेळ, सण-उत्सव आणि संस्कारमूल्यांविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही कविता, गाणी व छोटेखानी भाषणातून आपल्या भावना व्यक्त केल्या.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मुलांना त्यांच्या सहवासाची ओळख होणे गरजेचे (Grandparents’ Day)

“आजी-आजोबांच्या अनुभवातून मुलांना जीवनमूल्ये, परंपरा, कष्ट, माणुसकी आणि नात्यांची जपणूक शिकता येते. बदलत्या जीवनशैलीत मुलांना त्यांच्या सहवासाची ओळख होणे गरजेचे आहे,” असे मुख्याध्यापक ज्ञानदेव फापाळे यांनी सांगितले. यावेळी दादाभाऊ रंधे, हरिभाऊ बर्डे, संपत बर्डे, शांताराम मांडे, सीताराम ढोकरे, विकास मांडे, वैभव रंधे, माया बर्डे, रुक्मिणी मांडे, हिराबाई शेळके, नंदा बर्डे, नाना माळी आदी आजी-आजोबा उपस्थित होते.