Radhakrishna Vikhe Patil : शेवगावच्या हक्काचे पाणी कोणीही काढून घेणार नाही : राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil

0

Radhakrishna Vikhe Patil : शेवगाव : शेवगावच्या हक्काचे पाणी कोणीही काढून घेणार नाही. ताजनापूरच्या पहील्या आणि दुसर्या टप्प्यातील गावांना पाणी देताना कोणावरही अन्याय होवू न देता ताजपूरच्या तिसर्या टप्प्याची सुरूवात करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असून, त्याच्या सर्वेक्षणासाठी एक कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहीती जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली.

सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित

शेवगाव येथे मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार मोनिका राजळे अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अरूण नाईक अभियंता सुनंदा जगताप पल्लवी जगताप जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शेवगाव पाथर्डीतील शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या

मंत्री विखे पाटील यांनी तब्बल अडीच तास शेवगाव पाथर्डी तालुक्यातील शेतकरी नागरीक यांच्या तक्रारी जाणून घेत उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नाबाबत त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण घेतले. प्राधान्याने पाणी व चारा यांचा प्रश्न गंभीर असून यावरच अधिक सूक्ष्मपणे आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिल्या. टंचाईच्या परीस्थीतीत शेतकऱ्यांना पशुधनाचाच आधार मिळणार असून पशुधन वाचविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे गांभिर्य अधिकार्यांनी घ्यावे आशा सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

ताजनापूरच्या संदर्भात मंत्री विखे पाटील म्हणाले की(Radhakrishna Vikhe Patil )

, सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळावे हीच आमची भूमिका आहे.शेवगावचे हक्काचे पाणी कोणी काढून घेतलेले नाही.ताजनापूरच्या टप्पा एक मधील राहीलेली आठ गावे,दुसर्या टप्प्यातील बावीस गावांना पाणी देण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीस मंजूरी देण्यात आली असून,राहीलेल्या गावांसाठी तिसरा टप्पा करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असून या गावांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल पुढच्या तीन महीन्यात हे सव्हेक्षण पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याना दिले.

दुष्काळाची धग मोठ्या प्रमाणात असल्याने दोन्ही तालुक्यात असलेल्या सर्व पाझर तलावतील आणि बंधार्यातील गाळ काढण्याची मोहीम तातडीने सुरू करावी.यासाठी मागेल त्याला काम देण्याची तयारी ठेवून लोकांना दिलासा देण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिकार्यानी घ्यावी.

उपलब्ध असलेले पाणी पाण्यासाठी राखून ठेवावे लागणार आहे.उरर्वित पाणी शेतीला देण्याचा विचार होईल परंतू पाईप फोडून पाणी उचलण्याचा प्रयत्न झाल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलै असून,आतापर्तय ११४७ मोटारी जप्त करण्यात आल्याची माहीती मंत्री विखे पाटील यांंनी दिली.

टंचाईच्या काळात सर्व अधिकार्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात अतिशय संवेदनशीलपणे काम करावे.कोणताहीहलगर्जीपणा
खपवून घेतला जाणार नाही.

आ.मोनिका राजळे यांनी आपल्या भाषणात ताजनापूरच्या संदर्भात संभ्रम निर्माण करण्याचे काम झाले.त्यामुळे तिसरा टप्पा निर्माण करण्याचा जलसंपदा मंत्र्यांनी घेतेलेल्या निर्णयामुळे दोन वर्षात तिसरा टप्पा पूर्ण होईल आशी अपेक्षा व्यक्त केली.