Samarpan Chaturmas : आनंद तीर्थ समवशरण येथे भव्य जिनेश्वरी अनुष्ठान उत्साहात; देशाच्या विविध भागातून भाविकांचा सहभाग

पुढच्या पिढीला योग्य संस्कार मिळणार

0
Samarpan Chaturmas : आनंद तीर्थ समवशरण येथे भव्य जिनेश्वरी अनुष्ठान उत्साहात; देशाच्या विविध भागातून भाविकांचा सहभाग
Samarpan Chaturmas : आनंद तीर्थ समवशरण येथे भव्य जिनेश्वरी अनुष्ठान उत्साहात; देशाच्या विविध भागातून भाविकांचा सहभाग

Samarpan Chaturmas : नगर : राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा. यांच्या पावन भूमीत आनंद तीर्थ समवशरण (Anand Tirtha Samavasaran) येथे सुरू असलेल्या समर्पण चातुर्मासात (Samarpan Chaturmas) शुक्रवारी (ता. २) भव्य जिनेश्वरी अनुष्ठान (Grand Jineshvari Anushthan) पार पडले. हजारो महिलांनी यात सहभाग घेतला. नगरसह महाराष्ट्र तसेच देशाच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी यात सहभाग घेतला. ‘अहिल्यानगरकी गलियो में कमाल हो गया, सबको गुरू आनंद का दिदार हो गया’, या गीताने परिसर दुमदुमला.

नक्की वाचा : भाजपच्या माजी नगरसेवकासह तिघांवर ५७ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; पाथर्डीतील घटना

Samarpan Chaturmas : आनंद तीर्थ समवशरण येथे भव्य जिनेश्वरी अनुष्ठान उत्साहात; देशाच्या विविध भागातून भाविकांचा सहभाग
Samarpan Chaturmas : आनंद तीर्थ समवशरण येथे भव्य जिनेश्वरी अनुष्ठान उत्साहात; देशाच्या विविध भागातून भाविकांचा सहभाग

गोविंददेवगिरीजी महाराज यांचा सन्मान

आनंद तीर्थ समवशरण येथे महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी म.सा., उपाध्याय प्रवर पूज्य प्रविण ऋषीजी म.सा., पूज्य तिर्थेशऋषीजी म.सा., पूज्य आलोकऋषीजी म.सा., महासतीजी पूज्य सत्यप्रभाजी म.सा., पूज्य अमितज्योतीजी म.सा. आदी साधू साध्वीजींच्या सान्निध्यालत झालेल्या जिनेश्वरी अधिवेशनास अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे महा सचिव पूज्य गोविंददेवगिरीजी महाराज यांच्यासह समर्पण चातुर्मास समितीचे अध्यक्ष अशोक (बाबूशेठ) बोरा, महामंत्री आदेश चंगेडिया, कार्याध्यक्ष राजेश भंडारी, कोषाध्यक्ष विलास कटारिया, उपाध्यक्ष अनिल पोखरणा, राजकुमार बोरा, विजय गुगळे, सुरेश कांकरिया, सचिन देसरडा, मनसुख गुंदेचा, सहसचिव अभय गांधी, अभिजीत गांधी, कमिटी उपस्थित होते. कमिटीच्या वतीने गोविंददेवगिरीजी महाराज यांचा सन्मान करण्यात आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आग्रह सोडला तरच अनुग्रह होईल (Samarpan Chaturmas)

पूज्य प्रविण ऋषीजीमहाराज म्हणाले, जिज्ञासेतूनच नवीन ज्ञान प्राप्त होते. जंबूस्वामींनी सुधर्मा स्वामींना जिज्ञासेतून तीर्थंकर महावीर यांच्या विषयी माहिती विचारली आणि त्यानंतर‌ सुधर्मा स्वामींनी त्यांच्या अनुभूतीतील भगवान महावीर यांचे सुंदर वर्णन केले. आज तीर्थंकरांची शक्ती येथे जिनेश्वरी अधिवेशनात दिसून येत आहे. तीर्थंकरांच्या शक्तीतून जिनेश्वरी विश्वेश्वरी बनेल. महासागरातून आपण पाणी घेऊ शकत नाही तर त्यात सागराचा दोष नाही. आपल्याला आपली झोळी मजबूत करायची यासाठी हे अनुष्ठान आहे. आग्रह सोडला तरच अनुग्रह होईल. आयुष्यात फक्त परमात्म्याचे गुणगान केले पाहिजे. आपल्याकडे तीर्थंकरांची अद्भुत वाणी आहे. ऊर्जा आहे. फक्त त्यांचेच गुणगान व्हावे. जगाला जिनेश्वरीचे भक्त बनवायचे आहे.

पुढच्या पिढीला योग्य संस्कार मिळणार

पूज्य गोविंददेवगिरीजी महाराज म्हणाले की, आज याठिकाणी मला गुरू देवांचे मंगल आशिर्वचन प्राप्त झाले आहे. आचार्यश्रींचे अपार प्रेम मला प्राप्त झालेले आहे. ते आमच्या बेलापूर येथील घरी गोचरीसाठी यायचे, एवढे मोठे पुण्य आम्हाला लाभले. इथे जिनेश्वरी अनुष्ठान करणाऱ्या मातांना मी वंदन करतो. यातून पुढच्या पिढीला योग्य संस्कार मिळणार आहेत.समर्पण चातुर्मासाचे मुख्य लाभार्थी मुंबईचे प्रसिद्ध उद्योगपती आणि अहिल्यानगरचे सुपुत्र तथा तिरूपती बालाजी देवस्थानचे विश्वस्त सौरभ हेमराजजी बोरा, राखी सौरभ बोरा, प्रमिलाताई हेमराजजी बोरा, पराग बोरा व बोरा परिवार आहे.

अशोक बाबूशेठ बोरा म्हणाले, गुरूदेवांच्या पावन भूमीत जिनेश्वरी ग्रुपचे अतिशय भव्य दिव्य अधिवेशन झाले आहे. आज इथले दृष्य पाहून केशरचा वर्षाव झाल्याची अनुभूती आली. पूज्य कुंदनऋषीजी म.सा., पूज्य प्रविण ऋषीजी म.सा. यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले असून समर्पण चातुर्मास ऐतिहासिक ठरत आहे. आज पूज्य गोविंददेवगिरीजी महाराज यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. शेवटी मंगलपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here