
Nashik-Pune High-Speed Railway : संगमनेर : शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांनी संगमनेर येथील आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना खासदार वाकचौरे यांनी नाशिक-पुणे रेल्वे (Nashik-Pune High-Speed Railway) मार्गाच्या सद्यस्थितीवर सविस्तर भाष्य केले. यावेळी आमदार अमोल खताळ उपस्थित होते.
नक्की वाचा : मेरी आवाज ही पहचान है…! जरा हटके संकल्पना यशस्वी
८०० कोटी रुपयांचा निधी खर्च
खासदार वाकचौरे म्हणाले की, २००९ ते २०१४ दरम्यान खासदार असताना नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता. केंद्र सरकार, रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारच्या सहकार्याने सर्व तांत्रिक प्रक्रिया व सर्वेक्षण (DPR) पूर्ण होऊन या मार्गाला मंजुरी मिळाली होती. सुरुवातीला सिन्नर-संगमनेर मार्गाने जाणारा हा लोहमार्ग नंतर बदलण्यात आला. केंद्र सरकारने जमीन संपादनासाठी सुमारे ८०० कोटी रुपयांचा निधीही खर्च केला होता. परंतु, नारायणगाव येथील दुर्बिणीमुळे रेल्वे मार्गामुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तवून मार्ग बदलण्याचा प्रयत्न झाला. दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
केंद्रीय स्तरावर पुन्हा पाठपुरावा करणार (Nashik-Pune High-Speed Railway)
दुर्बिणीला अडथळा न होता किंवा मार्ग थोडा लांबून नेऊन हा प्रकल्प पूर्ण करावा, अशी मागणी रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. सध्या हा विषय राज्य सरकारच्या पातळीवर प्रलंबित असून, राज्य सरकारने नवीन समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. नाशिक-पुणे लोहमार्ग हा या भागातील वाहतूक आणि विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे आगामी संसदेच्या अधिवेशनात आणि दिल्लीत केंद्रीय स्तरावर पुन्हा पाठपुरावा केला जाईल.
पुढे जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यास आमचा कोणताही विरोध नाही, उलट बिनविरोध निवडीचे आम्ही स्वागतच करू. परंतु, चर्चेच्या प्रक्रियेत सर्वांना समान स्थान आणि सन्मान मिळणे गरजेचे आहे असेही खासदार वाकचौरे यांनी सांगितले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


