Lata Mangeshkar : मेरी आवाज ही पहचान है…! जरा हटके संकल्पना यशस्वी

आर. जे. प्रसन्न पाठक यांचाअनोख्या प्रेक्षकांशी संवाद

0
Lata Mangeshkar : मेरी आवाज ही पहचान है...! जरा हटके संकल्पना यशस्वी
Lata Mangeshkar : मेरी आवाज ही पहचान है...! जरा हटके संकल्पना यशस्वी

Lata Mangeshkar : नगर : श्री गुरुमाऊली संगीत विद्यालय (Shri Gurumauli Sangeet Vidyalaya) आयोजित ‘मेरी आवाजही पहचान है’ हा गाण्यांचा कार्यक्रम भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना समर्पित करण्यात येतो. पण ह्या वर्षी लतादीदींच्या इतकाच कालखंड आपल्या गाण्यांनी समृद्ध करणाऱ्या आशा भोसले व सुमन कल्याणपूर या दोन विभूतींचेही स्मरण व्हावे व त्यांनाच नव्हे तर गाण्याचा सुवर्णकाळ गाजवलेल्या सर्वच गायिकांना (Female Singers) ‘जरा हटके ‘ या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रद्धांजली वाहिली गेली.

नक्की वाचा : आनंद तीर्थ समवशरण येथे भव्य जिनेश्वरी अनुष्ठान उत्साहात; देशाच्या विविध भागातून भाविकांचा सहभाग

Lata Mangeshkar : मेरी आवाज ही पहचान है...! जरा हटके संकल्पना यशस्वी
Lata Mangeshkar : मेरी आवाज ही पहचान है…! जरा हटके संकल्पना यशस्वी

आर. जे. प्रसन्न पाठक यांचाअनोख्या प्रेक्षकांशी संवाद

कार्यक्रमाच्या सुरुवातीलानगरचे प्रसिद्ध आर. जे. प्रसन्न पाठक यांनी त्यांच्या अनोख्या मिश्किल शैलीमध्ये प्रेक्षकांशी संवाद साधला.प्रेक्षकांमध्ये फिरून प्रेक्षकांनाच त्यांच्या आवडीची गाणी गायला लावून जरा हटके ची सुंदर वातावरण निर्मिती केली. त्यानंतर मान्यवरांच्या आगमनानंतर मंचावर दीप प्रज्वलन व नटराज पूजन झाले. आपल्या सेवाभावी कार्यातून समाजासाठी आदर्श ठरलेले नगरमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारे , सन्माननीय मा. राजेंद्रजी चोपडा , मा. डॉ नीरज करंदीकर, मा. कमलेश भंडारी आणि गौतम मुनोत यांचा त्यांच्या महनीय कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, मोतीमाळ व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

त्यावेळी मंचावर मा प्रा. शरद कोलते, चिन्मय सुखटनकर, डॉ दमण काशीद , अशोक गांधी जरीवाला, अॅड जयंत भापकर, हेमचंद्र इंगळे, हेमंत नेवासकर, शाम रेणाविकर, गजेंद्र कुलकर्णी, डॉ सागर कड, डॉ हेमंत नाईक, रवींद्र बक्षी. जनकशेट आहुजा, निर्मल खंडेलवाल, धनेश बोगावतवसंत बोरा, अॅड प्रमोद मेहेर, पद्माकर वांजळे आदी मान्यवर उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

Lata Mangeshkar : मेरी आवाज ही पहचान है...! जरा हटके संकल्पना यशस्वी
Lata Mangeshkar : मेरी आवाज ही पहचान है…! जरा हटके संकल्पना यशस्वी

अभ्यासपूर्ण व ओघवत्या शैलीमध्ये कार्यक्रमाची सुरुवात (Lata Mangeshkar)

त्यानंतर कार्यक्रमातील सर्व कलाकारांचाही सत्कार करण्यात आला. विद्यालयाच्या प्रथेप्रमाणे विद्यालयाच्या नृत्य विभागाच्या ईश्वरी काळे, आस्था पिंगळीकर, दर्शना दंडवते, गौरी साठ्ये, ध्रुवी पोटे, सृष्टी गंधे या विद्यार्थिनींनी गणेश वंदना नृत्य सादर करून कार्यक्रमाची सांगीतिक सुरुवात केली. त्यानंतर कार्यक्रमाची पुढील सूत्र प्रसन्न पाठक यांनी पुण्याचे सुप्रसिद्ध निवेदक डॉ. प्रसादजी पिंपळखरे यांच्याकडे सुपूर्त केली. त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व ओघवत्या शैलीमध्ये कार्यक्रमाची
सुरुवात केली लतादीदींच्या ‘कुछ दिलने कहा’ या गाण्याने झाली. त्यानंतर एकापेक्षा एक सरस असलेल्या चाळीस ते ऐंशी च्या दशकातल्या गायिकांनी गाऊन अजरामर केलेली गाणी विद्यालयाच्या संचालिका नृत्य तपस्वी वर्षा पंडित यांनी सादर केली.

Lata Mangeshkar : मेरी आवाज ही पहचान है...! जरा हटके संकल्पना यशस्वी
Lata Mangeshkar : मेरी आवाज ही पहचान है…! जरा हटके संकल्पना यशस्वी

प्रेक्षक मंत्रमुग्ध

त्यात आपल्या दमदार पण किंचित अनुनासिक आवाजाने एक काळ गाजवलेल्या शमशाद बेगम, नूरजहाँ, राजकुमारी, उमादेवी, जगजीत कौर, तसेच सीमेपलीकडून आलेल्या सलमा आगा असोत किंवा आपल्या गोड आणि सुरेल आवाजाने सर्वांना वेड लावणाऱ्या सुरैया , गीता दत्त, मुबारक बेगम नंतरच्या काळातील हेमलता असोत या सर्वांच्या आवाजातील गाण्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. आणि काळाच्या पुढे असणाऱ्या आणि आपल्या आयुष्यातील सत्तर पेक्षाही जास्त वर्ष गायलेल्या आणि अनेक भाषांमध्ये गायलेल्या गाण्यांनी मनुष्य जातीला संजीवनी देणाऱ्या आशा भोसले , सुमन कल्याणपूर, यांची जुन्या काळातील काही अवीट गाणी ऐकताना प्रेक्षक त्या काळात हरवून गेले.

ही संकल्पना रसिकांच्या पसंतीस उतरली

वेगवेगळ्या रंगांच्या आणि आल्हाददायी गंध असलेल्या फुलांनी सजवलेला गुच्छ असल्यासारखा हा कार्यक्रम वर्षा पंडित तसेच पुण्याहून आलेले सुप्रसिद्ध गायक चंद्रशेखर महामुनी यांच्या आवाजाने उत्तरोत्तर रंगत गेला. पडद्याआड गेलेले पण त्यांच्या आवाजाने अमर झालेले गायक मुकेश , महमद रफी , किशोर कुमार, तलत महमूद , शामसुंदर चढ्ढा, सुरेंद्र यांनी गायलेली युगल गीतेही प्रेक्षकांना खूप भावली. चंद्रशेखर महामुनी यांनी प्रेक्षकांनी ऐन वेळी केलेल्या खास फरमाइशीवरून ‘गायलेल्या खोया खोया चांद ‘ या गाण्याने तर कार्यक्रमाला चार चाँद लावले.

या कार्यक्रमासाठी तबल्यावर अमेय ठाकूर देसाई, कीबोर्ड वर अक्षय कावळे व झंकार कानडे, बासरीवर सुप्रसिद्ध बासरीवादक अमर ओक यांचे चिरंजीव अभय अमर ओक यांनी बासरीवर,सिद्धार्थ कदम यांनी ऑक्टोपॅड, तर हनुमंत रावडे यांनी ढोलकवर अतिशय सुंदर साथसंगत केली एकुणच या मैफलीस लाभलेला हा पुणे व मुंबईचा वाद्यवृंद अप्रतिम होता .पुणे येथील नुपूर ऑडिओचे साऊंड इंजिनीअर – निनाद कांबळे, यांनी संपूर्ण ध्वनीयोजना सुरेख सांभाळलीनगरचे जगविख्यात चित्रकार श्री. प्रमोद कांबळे यांनी कार्यक्रमाच्या वेळी लता मंगेशकर यांचे अप्रतिम चित्र रेखाटन केले. तर दिनेश मंजरतकर यांनी रांगोळीने लतादीदीची छबी रेखाटली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विलास बडवे धनेश बोगावत आदींनी खूप परिश्रम घेतले. चंद्रकांत पंडित यांची ‘ जरा हटके ‘ ही संकल्पना रसिकांच्या पसंतीस उतरली.