Dead Body Found : राहुरी : देवळाली प्रवरा (Deolali Pravara) येथे विवाहित महिला तिच्या दोन चिमुकल्या मुलांसह राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी (ता.५) रात्री आठच्या सुमारास वंदना गणेश गाढे (वय ३५), चैतन्य गणेश गाढे (वय ७) आणि जीवन गणेश गाढे (वय ३) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना रात्री घडल्याचे समजते. तिघेही राहत्या घरात मृतावस्थेत आढळून (Dead Body Found) आले. या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, हा आत्महत्येचा प्रकार आहे की घातपात याबाबत अद्याप अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी, पंचनामा तसेच अन्य आवश्यक तपासणी करण्यात येत आहे.
नक्की वाचा : ओडिशातून पुण्याकडे जाणारा ७६ लाखांचा गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेकडून दोघांना अटक
पत्नी व दोन्ही मुले मृतावस्थेत
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चैतन्य हा काही काळापासून आपल्या आत्याकडे शिक्षणासाठी राहत होता. सोमवारी सकाळी तो आई वंदना यांच्याकडे घरी आला होता. दरम्यान, वंदना यांनी दोन्ही मुलांसह टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. वंदना यांचे पती गणेश जगन्नाथ गाडे हे सेंट्रिंगच्या कामासाठी बाहेर गेले होते. सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले असता घराचा दरवाजा बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी पत्नी व दोन्ही मुले मृतावस्थेत आढळून आली. या तिघांचा मृत्यू सायंकाळी सहा वाजण्यापूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पतीकडून मानसिक त्रास होत असल्याचा उल्लेख (Dead Body Found )
या घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह साई प्रतिष्ठाणचे रुग्णवाहीणीका चालक पप्पू कांबळे यांनी शवविच्छदनासाठी मृतदेह ग्रामिण रुग्णालयात नेले मंगळवारी सकाळी शवविच्छदनाच्यावेळी वंदनाच्या अंगावरील कपड्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुसाईड नोट आढळल्याची माहिती पोलिसांना दिली या सुसाईड नोट मध्ये पतीकडून मानसिक त्रास होत असल्याचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘रोज घालून-पाडून बोलत होता’, त्यामुळे पत्नीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सुसाईड नोटची सत्यता, त्यातील मजकूर आणि आत्महत्येमागील नेमके कारण याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दरम्यान, घटनेप्रकरणी पती गणेश गाडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. कौटुंबिक वाद, मानसिक त्रास अथवा अन्य काही कारण या घटनेमागे आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल गणेश लिपणे, सुरज गायकवाड, राहुल यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दोन चिमुकल्या मुलांसह आईच्या मृत्यूच्या या घटनेने कारवाडी परिसरासह संपूर्ण देवळाली प्रवरा शहरावर शोककळा पसरली आहे.



