District Bank : जिल्हा बँकेच्या उमेदवारी अर्जांवर आक्षेपांचा पाऊस; उद्या चित्र स्पष्ट

अनेक अर्जांवर हरकती; सुजय विखे पाटील, राहुल जगताप, किरण लहामटे, मोनिका राजळे, प्रणोती जगताप यांच्या अर्जांवरही आक्षेप

0
District Bank : जिल्हा बँकेच्या उमेदवारी अर्जांवर आक्षेपांचा पाऊस; उद्या चित्र स्पष्ट
District Bank : जिल्हा बँकेच्या उमेदवारी अर्जांवर आक्षेपांचा पाऊस; उद्या चित्र स्पष्ट

District Bank : नगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (District Central Cooperative Bank) २१ संचालक पदांसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत मंगळवारी (ता.६) उमेदवारी अर्जांची छाननी (Scrutiny of nomination forms) झाली. विविध अर्जांवर हरकती घेण्यात आल्याने दिवसभर निवडणूक कार्यालयाच्या (Election Office) परिसरात राजकीय हालचालींना वेग आला. माजी खासदार सुजय विखे पाटील, माजी आमदार राहुल जगताप, आमदार किरण लहामटे आणि आमदार मोनिका राजळे यांच्या उमेदवारी अर्जांवरही आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

नक्की वाचा : विवाहित महिलेसह दोन चिमुकल्यांचा मृतदेह आढळला; देवळाली प्रवरा येथील घटना

District Bank : जिल्हा बँकेच्या उमेदवारी अर्जांवर आक्षेपांचा पाऊस; उद्या चित्र स्पष्ट
District Bank : जिल्हा बँकेच्या उमेदवारी अर्जांवर आक्षेपांचा पाऊस; उद्या चित्र स्पष्ट

अंतिम निर्णय बुधवारी होणार जाहीर

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज छाननीची प्रक्रिया पार पडली. छाननीदरम्यान काही उमेदवारांच्या अर्जांसोबत आवश्यक कागदपत्रे नसल्याचे निदर्शनास आले. लेखापरीक्षण अहवाल, आधार कार्ड तसेच अन्य कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी संबंधित उमेदवारांना दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर प्राप्त हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. ही प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होती.मात्र, अर्ज वैध की अवैध याबाबतचा अंतिम निर्णय बुधवारी (ता. ७) जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे नेमके चित्र उद्याच स्पष्ट होणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

District Bank : जिल्हा बँकेच्या उमेदवारी अर्जांवर आक्षेपांचा पाऊस; उद्या चित्र स्पष्ट
District Bank : जिल्हा बँकेच्या उमेदवारी अर्जांवर आक्षेपांचा पाऊस; उद्या चित्र स्पष्ट

अनेक तालुक्यांतील अर्जांची सुनावणी (District Bank)

नेवासा, संगमनेर, शेवगाव, श्रीरामपूर, पाथर्डी, नगर तालुका, जामखेड, राहाता, राहुरी, कोपरगाव, पारनेर, अकोले, कर्जत आणि श्रीगोंदा या तालुक्यांतील उमेदवारी अर्जांची छाननी व हरकतींवरील सुनावणी करण्यात आली. दरम्यान, प्रमुख राजकीय नेत्यांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आल्याने निवडणूक कार्यालयाबाहेर उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. संभाव्य तणावाची शक्यता लक्षात घेऊन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आता अर्ज छाननीचा अंतिम निर्णय बुधवारी जाहीर होणार असून त्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील खरे चित्र समोर येणार आहे.