National Boxing Championship : राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कर्नल परब्स स्कूलचे उल्लेखनीय यश; २ सुवर्ण, ४ रौप्य व १ कांस्यपदक प्राप्त

राष्ट्रीय स्तरावर अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल

0
National Boxing Championship : राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कर्नल परब्स स्कूलचे उल्लेखनीय यश; २ सुवर्ण, ४ रौप्य व १ कांस्यपदक प्राप्त
National Boxing Championship : राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कर्नल परब्स स्कूलचे उल्लेखनीय यश; २ सुवर्ण, ४ रौप्य व १ कांस्यपदक प्राप्त

National Boxing Championship : नगर : कर्नल परब्स स्कूल (Colonel Parab’s School) – अ गुरुकुल या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सीआयएससीई (CISCE) राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत (National Boxing Championship) उत्कृष्ट कामगिरीची नोंद करत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. २८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत जबलपूर, मध्य प्रदेश (Madhya Pradesh) येथे आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकूण २ सुवर्ण, ४ रौप्य आणि १ कांस्यपदकासह एकूण ७ पदके पटकावून शाळेच्या क्रीडा परंपरेत बहुमानाची भर घातली आहे.

नक्की वाचा : जिल्हा बँकेच्या उमेदवारी अर्जांवर आक्षेपांचा पाऊस; उद्या चित्र स्पष्ट

देशभरातून खेळाडू सहभागी

देशभरातून सहभागी झालेल्या खेळाडूंसमोर कर्नल परब्स् स्कूलच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा कौशल्य, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या बळावर यशस्वी कामगिरी केली. स्पर्धेतील विविध गटांमध्ये ईश्वरी जाधव आणि आराध्या खंडेलवाल यांनी सुवर्णपदक पटकावून राष्ट्रीय विजेतेपद संपादन केले. काव्या खिळे, अनय परदेशी, वेदांत बडे आणि अर्णव निकरड यांनी उपविजेतेपद मिळवत रौप्यपदकावर आपले नाव कोरले, तर श्रीराज सुरवसे याने कांस्यपदक प्राप्त केले. तसेच सिया अडसुरे आणि प्रद्युम्न शेळके यांनी राष्ट्रीय स्तरावर शाळेचे अधिकृत प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय सहभाग नोंदवला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

राष्ट्रीय स्तरावर अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल (National Boxing Championship)

राष्ट्रीय स्तरावर अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षकांचे कर्नल परब्स् स्कूलच्या संस्थापिका गिता परब, संचालक दिलीप परब, रिकीराज परब आणि मुख्याध्यापिका अर्पिता रणनवरे, शिक्षकवृंद व पालकांनी विजयी खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामागे त्यांचे अथक परिश्रम, सराव, आणि शाळा व्यवस्थापनाद्वारे उपलब्ध करून दिलेल्या भौतिक सुविधा आणि प्रशिक्षक गणेश खडका व उस्मान शेख यांचे तांत्रिक मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. हे विद्यार्थी भविष्यातही क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त करतील असा विश्वास कर्नल परब्स् स्कूलच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.